________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
पाळत आहे. आता जरी तुम्ही त्याच्याशी संघर्ष करण्याच्या कितीही नव्या-नव्या पद्धती शोधून काढल्या, तहेतहेच्या शिव्या दिल्या तरीही तो संघर्ष न करता तिथून निसटून जाईल.
म्हणजे संघर्ष टाळा, संघर्षानेच हे जग टिकून आहे. यालाच भगवंताने 'जग वैरभावाने निर्माण झाले' असे म्हटले आहे. प्रत्येक मनुष्य, फक्त मनुष्यच नव्हे तर प्रत्येक जीव वैर बांधत असतो. प्रमाणापेक्षा जास्त झाले म्हणजे वैर बांधल्याशिवाय राहतच नाही. मग तो साप असो, विंचू असो, बैल असो की रेडा असो कुणीही असो पण शेवटी वैर बांधतोच. कारण प्रत्येकात आत्मा आहे. आत्मशक्ती प्रत्येकात सारखीच आहे. कारण या पुद्गलच्या निर्बळतेमुळे सहन करावे लागते. पण सहन करण्याबरोबर तो वैर बांधल्याशिवाय राहत नाही. किंबहुना तो पुढच्या जन्मी या वैराचा बदलाही घेतो!
सहन? नाही, समाधान आणा प्रश्नकर्ता : दादा, संघर्ष टाळायचे तुम्ही जे सांगितले याचा अर्थ सहन करणे असाच झाला ना?
दादाश्री : संघर्ष टाळायचा म्हणजे सहन करणे नव्हे. सहन कराल तर किती करू शकाल? सहन करणे आणि स्प्रिंग दाबणे हे दोन्ही सारखेच आहे. स्प्रिंग दाबून ठेवलेली किती दिवस राहील?! म्हणून सहन करण्याचे शिकूच नका, गोष्टीवर तोडगा आणण्याचे शिका.
अज्ञान दशेत सहनच करण्याचे असते. नंतर एक दिवस स्प्रिंग इतकी जोरात उसळते की सर्व उध्वस्त करुन टाकते. निसर्गाचा नियमच हा असा आहे.
कुणामुळे आपल्याला सहन करावे लागेल असा जगाचा नियमच नाही. दुसऱ्यांमुळे आपल्याला जे काही सहन करावे लागते तो खरोखर तर आपलाच हिशोब आहे, पण आपल्याला हे समजत नाही की हा