________________
समजदारीने शोभेल गृहसंसार
६१
जाणे हा पुद्गल स्वभाव आहे आणि द्वेष ठेवणे यामागे तुमचा आधार आहे. म्हणून आपल्याला तर समभावे निकाल करायचा आहे असा ठाम निश्चय करून काम करीत राहायचे मग हिशोब चुकता होणारच. मागणाऱ्याला आज नाही देऊ शकलो तर उद्या देऊ. होळी आल्यावर देऊ, नाही तर दिवाळी आल्यावर देऊ. पण मागणारा घेऊनच जाईल.
या जगातील लोक हिशोब चुकवल्यानंतर तिरडी वर जातात. या जन्माचे हिशोब कसेही करून चुकते करतात पण या जन्मात नवीन बांधतात ते वेगळे. आता आपण नवीन (हिशोब) बांधत नाही आणि जुने आहेत ते या जन्मात चुकते होणारच. सगळे हिशोब संपले म्हणून भाऊ चालले तिरडीवर! आणि जिथे हिशोब अपूर्ण राहिले असतील तिथे आणखी काही दिवस जास्त राहावे लागेल. या जन्माचे सगळे हिशोब या शरीराच्या माध्यमाने चुकतेच होऊन जाणार. आणि या जन्मात जितका गुंता केला असेल तो सोबत घेऊन जातो, मग पुढील जन्मात नव्याने हिशोब सुरु होतो.
...म्हणून संघर्ष टाळा म्हणून कोणत्याही परिस्थितीत संघर्ष टाळा. या संघर्षामुळे या जन्माचे तर बिघडवतातच परंतु पुढील जन्माचे सुद्धा बिघडवतात! जो या जन्माचे बिघडवतो तो पुढच्या जन्माचे बिघडवल्याशिवाय राहत नाही! ज्याचा हा जन्म सुधरतो त्याचा पुढचा जन्म सुद्धा सुधरतो. या जन्मात जर आपल्याला कोणत्याच प्रकारची अडचण आली नाही तर समजावे की पुढील जन्मासाठी पण काहीच अडचणी नाही. आणि इथे केलेल्या सर्व अडचणी पुढच्या जन्मात सोबतच येणार आहेत.
प्रश्नकर्ता : संघर्षाचा सामना संघर्षाने केला तर काय होते?
दादाश्री : डोके फुटते! एक माणूस मला संसार पार करण्याचा मार्ग विचारत होता. त्यास मी सांगितले की, 'संघर्ष टाळ.' त्याने मला विचारले की, 'संघर्ष म्हणजे काय' तेव्हा मी म्हणालो की आपण सरळ