________________
क्लेश रहित जीवन
जाईल? एकवेळी समोरच्याचे समाधान झालेही, पण त्यात त्याचे अहित असेल तर ?
६०
दादाश्री : ते तुम्ही पाहू नका. समोरच्याचे अहित असेल ते तर त्याचे त्यालाच पाहायचे आहे. तुम्हाला समोरच्याचे हित पाहायचे, पण त्याचे हित पाहण्याची शक्ती आहे का तुमच्यात ? तुम्ही तुमचेच हित ओळखू शकत नाही मग दुसऱ्याचे हित कसे ओळखणार ? प्रत्येकजण आपापल्या क्षमतेप्रमाणे हित पहातात, तेवढे हित पाहावे. पण समोरच्याचे हित पाहता-पाहता संघर्ष निर्माण होईल असे होता कामा नये.
प्रश्नकर्ता : समोरच्याचे समाधान करण्याचा आपण प्रयत्न करू पण त्याचा परिणाम काही वेगळाच होणार आहे अशी आपल्याला खात्री असेल तर मग काय करावे ?
दादाश्री : परिणाम काहीही येवो, पण तुम्ही समोरच्या व्यक्तीचे समाधान करायचे आहे हा भाव निश्चित ठेवायचा. 'समभावे निकाल' करायचा आहे असे नक्की करा, मग निकाल होणार की नाही होणार याचा विचार आधीपासून करू नये. आणि निकाल निश्चित होणारच ! आज नाहीतर दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. खूपच चिकट असेल तर दोन वर्ष, तीन वर्ष किंवा पाच वर्षही लागतील. बायकोचे ऋणानुबंध खूप गाढ (चिकट असतात) तिथे थोडा जास्त वेळ लागतो. हे सगळे आपल्यासोबतच असतात, तिथे निकाल हळूहळू होतो. पण आपण ठरवले आहे की, कधी ना कधी आपल्याला समभावे निकाल करायचाच आहे म्हणून त्याचा निकाल होईलच, त्याचा अंत येईलच. जिथे चिकट ऋणानुबंध असतात तिथे फार जागृत राहावे लागते, अगदी छोटासा साप असला तरी देखील सतत सावध राहावे लागते. बेसावध राहिलो तर समाधान होणार नाही. समोरची व्यक्ती बोलली आणि तुम्ही सुद्धा बोललात, बोलण्यातही हरकत नाही, पण बोलण्यामागे 'समभावे निकाल करायचा आहे' असा तुमचा निश्चय आहे, म्हणून द्वेष राहत नाही. बोलले