________________
क्लेश रहित जीवन
लाभ घ्या. हे तर रिलेटिव्ह (आधारित) संबंध आहेत, बायको सुद्धा रिलेटिव्ह आहे! अरे, हा देहच रिलेटिव्ह आहे ना! रिलेटिव्ह म्हणजे यांचाशी नीट वागला नाहीत तर ते तुम्हाला सोडून जातील!
कुणालाही सुधारण्याची शक्ती या काळात संपलेली आहे. म्हणून सुधारण्याची आशा सोडूनच द्या. कारण (तुमच्यात) मन,वचन,कायेची एकात्मवृत्ती असेल तरच तुमच्याकडून समोरचा सुधरू शकेल. जसे मनात असेल तसेच वाणीत निघेल आणि तसेच वागणुकीत असेल तरच समोरचा सुधरेल. आता हे राहिलेले नाही. घरात प्रत्येकासोबत असा व्यवहार ठेवा की ज्यामुळे सगळ्यांशी नॉर्मल (सुरळीत) संबंध राहू शकतील.
___ त्यात मूर्च्छित होण्यासारखे आहेच काय?
मुले 'आजोबा, आजोबा' असे म्हणतात तेव्हा आजोबा आतून खुश होतात! अरे, मुले 'आजोबा, आजोबा' म्हणणार नाहीत तर काय 'मामा, मामा' म्हणणार ?! ही मुले 'आजोबा, आजोबा' म्हणतात पण मनात समजून असतात की आजोबा म्हणजे जे थोड्या दिवसानंतर मरणार आहेत. जे आंबे आता बेकार झाले आहेत, फेकायाच्या लायाकीचे झाले आहेत त्यांचे नाव आजोबा! आणि आजोबा आतल्या आत खुश होतात की मी आजोबा झालो! असे हे जग आहे!
अरे, पप्पांनाच मुलगा जर गोड, बोबड्या भाषेत म्हणाला की, 'पप्पाजी चला, आई चहा प्यायला बोलवते.' तेव्हा तो पप्पा आतून इतका खुश होतो, इतका गद्गद होतो की विचारु नका! एक तर बोबडे बोल, गोड बोल, त्यातही जर पप्पाजी म्हटले... म्हणजे तिथे तर मोठा पंतप्रधान असेल त्यांची पण काही किंमत नाही. तो मनातल्या मनात असे मानून बसतो की या जगात माझ्याशिवाय दुसरा कोणी पप्पाच नाही. अरे मुर्खा, ही कुत्री, मांजरे, गाढवे सुद्धा त्यांच्या पिल्लांचे पप्पाच आहे ना? कोण पप्पा होत नाही? ही सगळी भांडणे त्यामुळेच तर आहेत ना? समजूनउमजून कोणी पप्पा बनला नाही, असे चारित्र्य जर कोणाच्या उदयात