________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
काय म्हणते?' ती म्हणते की 'माझा नवरा एकदम बेकार आहे. बिनअकली आहे.' मग आता यात तुम्ही स्वतःसाठी एकतर्फी न्याय कशाला शोधता? तेव्हा तो भाऊ म्हणाला की, 'माझे पूर्ण घर बिघडले आहे. मुले बिघडली आहेत, बायको बिघडली आहे.' मी म्हणालो, 'काहीही बिघडलेले नाही. तुम्हाला ते बघता येत नाही. तुम्हाला तुमचे घर बघणे जमले पाहिजे.' तुमचे घर तर एक बाग आहे. सतयुग, व्दापारयुग आणि त्रेतायुगातील घरे शेतासारखी असत. एखाद्या शेतात फक्त गुलाब, एखाद्या शेतात फक्त चमेली, एखाद्या शेतात फक्त मोगरा असे होते. आता या कलियुगात शेत उरली नाहीत, फक्त बागा आहेत. म्हणजे (बागेत) एक गुलाब, एक मोगरा, एक चमेली! आता घरात तुम्ही वडीलधारी गुलाब आहात आणि घरातील सर्वांना गुलाब करू इच्छिता. तुम्ही दुसऱ्या फुलांना म्हणता की 'तू माझ्यासारखा नाहीस, तू तर पांढरा आहेस. तुला पांढरे फूल का आले? गुलाबी फूल आण. अशाप्रकारे समोरच्याला टोचून बोलत राहतात! अरे, फुलाला पाहायला (ओळखायला) तर शिका.तुम्हाला फक्त एवढेच जाणून घ्यायचे आहे के समोरच्या व्यक्तीची प्रकृती कशी आहे? कुठल्या प्रकारचे फूल आहे. फळे-फुले येईपर्यंत रोपट्याला पाहत राहायचे की हे रोपटे कसले आहे? मला तर काटे आहेत याला नाहीत. माझे गुलाबाचे रोपटे आहे, याचे गुलाबाचे नाही. मग फूल आल्यावर आपल्याला कळेल की, 'ओहोहो! हा तर मोगरा आहे!' मग त्याच्याबरोबर मोगऱ्याप्रमाणे वागणूक ठेवावी. चमेली असेल तर चमेलीप्रमाणे वागावे, समोरच्याच्या प्रकृतीस्वभावानुसार वागणूक ठेवावी. पूर्वीच्या काळी वडिलधाऱ्यांच्या मतानुसार मुलांना, सुनांना वागावे लागे. आता कलियुगात निरनिराळी प्रकृती (स्वभाव), तेव्हा कुणाचे एकमेकांशी जुळत नाही, म्हणून या काळात तर घरातील सगळ्यांची प्रकृती ओळखून एडजस्ट होऊन राहता आले पाहिजे. एडजस्ट होणे जमले नाही तर नाती बिघडतील. म्हणून बागेला सांभाळा आणि माळी व्हा. बायकोचा प्रकृतीस्वभाव वेगळा असेल, मुलांचा, मुलींचा सगळ्यांचाच प्रकृतीस्वभाव वेगवेगळा असतो. प्रत्येकाच्या प्रकृतीस्वभावाचा