________________
क्लेश रहित जीवन
कुठे होते तुझे ?' असे तुम्ही हातोडे मारता. हे 'ग्लास हॅन्डल विथ केअर' समजून घेतले तर स्वरूपज्ञान दिले नसेल तरीही समजू शकेल.
५०
या जगाला सुधारण्याचा रस्ताच प्रेम आहे. जग ज्याला प्रेम म्हणते ते प्रेम नाही, ती तर आसक्ती आहे. या मुलीवर प्रेम करता; पण जेव्हा तिच्या हातून ग्लास फुटतो तेव्हा प्रेम राहते का ? तेव्हा तर तुम्ही चिडता म्हणून ती आसक्ती आहे.
मुले-मुली आहेत त्यांच्याशी तुम्हाला पालका प्रमाणे, ट्रस्टीप्रमाणे राहायचे आहे. त्यांच्या लग्नाची चिंता करण्याचे कारण नाही. घरात जे काही घडते त्याला 'करेक्ट' आहे असे म्हणा. 'इनकरेक्ट' म्हणाल तर काहीही फायदा होणार नाही. चुकीचे पाहणाऱ्यांना संताप होईल. ज्याचा एकुलता एक मुलगा मेला असेल त्याला करेक्ट आहे असे म्हणू नये. तिथे तुम्ही 'खूप वाईट झाले ' असे म्हणा. असा दिखावा करावा लागेल. नाटक करावे लागेल. बाकी आतून तर करेक्ट आहे असे समजून चालावे. काचेचा ग्लास जोपर्यंत हातात आहे तोपर्यंत ग्लास आहे ! नंतर तो निसटला आणि फुटला तर करेक्ट आहे असे म्हणावे. मुलीला सांगावे 'जरा जपून चालत जा, परंतु आत करेक्ट आहे असेच म्हणावे. ' रागीट वाणी निघाली नाही तर समोरच्याला टोचत नाही. फक्त क्रोधाने तोंडावर बोलणे यालाच क्रोध म्हटले जात नाही, तर आतल्या आत कुढणे तोही क्रोधच आहे. आणि सहन करणे हे तर दुप्पट क्रोध आहे. सहन करणे म्हणजे दाबत राहणे, हे तर जेव्हा स्पिंग उसळेल तेव्हा समजेल. सहन कशाला करायचे ? त्याचे समाधान तर ज्ञानाने करावे. उंदराने मिशा कुरतडल्या ते 'पाहायचे' आणि 'जाणायचे' त्यात रडारड कशासाठी ? हे जग पाहण्यासाठी आणि जाणण्यासाठी आहे !
घर, एक बाग
एक भाऊ मला म्हणाला की, 'दादा, घरात माझी बायको असे करते, तसे करते.' त्यावर मी त्याला म्हणालो, 'बायकोला विचारा ती