________________
४८
क्लेश रहित जीवन
प्रश्नकर्ता : अभ्यास तर शाळेत होतो; पण संस्कार घडविण्याचे
काय?
दादाश्री : घडवायचे काम सोनाराकडे सोपवा. त्यात जे प्रवीण (कुशल) असतील त्यांच्याकडे त्यांना सोपवा. मुलगा पंधरा वर्षाचा होईपर्यंत तुम्ही त्याला सांगू शकता. तोपर्यंत तुम्ही जसे आहात तसा त्याला बनवा. त्यानंतर त्याची बायकोच त्याला घडवील. घडवता येत नसेल तरीही लोक घडवतच राहतात ना?! म्हणून घडण चांगली होत नाही. मूर्ती चांगली होत नाही. नाक अडीच इंचाचे हवे तिथे साडे चार इंचाचे होते. मग बायको येईल ती त्याचे नाक कापून बरोबर अडीच इंचाचे करेल. नंतर तो पण तिचे नाक कापेल आणि म्हणेल, · ये आता, बघतो तूला.'
कर्तव्यात नाटकीय रहा हे नाटक आहे ! नाटकातील पत्नी-मुलांना कायमची स्वत:ची मानाल तर चालेल का? हो, नाटकात बोलतात तसे बोलण्यास हरकत नाही.' हा माझा मोठा मुलगा, शतायू होवो.' पण सर्व वरवर, 'सुपरफ्लुअस', नाटकीय. या सगळ्यांना खरे (स्वतःचे) मानले त्याचेच प्रतिक्रमण करावे लागतात. जर खरे मानले नसते तर प्रतिक्रमण करावेच लागले नसते. जिथे खरे मानू लागतो तिथे राग-व्देष सुरु होतात, आणि प्रतिक्रमण केल्यानेच मोक्ष मिळतो. या दादांनी दाखवले त्या आलोचनाप्रतिक्रमण-प्रत्याख्यानानेच मोक्ष आहे.
__ हा संसार तर 'तायफा' (फजिती) आहे, मोठी चेष्टाच आहे. तासभर जर मुलांशी भांडण केले तर मुलगा काय म्हणेल? 'तुम्ही इथे राहाणार असाल तर मी इथे राहाणार नाही.' त्यावर जर बाप म्हणाला, 'मी तुला माझी संपत्ती देणार नाही.' तेव्हा मुलगा म्हणेल, 'तुम्ही कोण आले मला न देणारे?' ते मारून-ठोकून घेतील असे आहेत. अरे कोर्टात एक मुलगा वकिलांना म्हणाला, 'माझ्या वडिलांचे नाक कापले जाईल