________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
पंचवीस वर्षाचा झाला की बाप होऊन जातो. अजूनपर्यंत तर त्याचाच बाप त्याच्यावर ओरडत असतो! तो तर रामभरोसे बाप बनतो. मग यात मुलाचा काय दोष? ही मुले आमच्याजवळ सगळ्या चुका मान्य करतात, चोरी केली असे तर तेही मान्य करतात. आलोचना तर जे अद्वितीय, अजोड असतील तिथेच केली जाते. हिंदुस्तानाचे अदभुत स्टेजमध्ये परिवर्तन होणार !
५७
संस्कार प्राप्तीसाठी, तसे चारित्र्य हवे
प्रश्नकर्ता : दादा. घरात शांततामय वातावरण राहील आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकू असे काही करून द्या.
दादाश्री : फक्त घरातच शांतता राहील एवढेच नाही; पण मुले सुद्धा आपले बघून अधिक संस्कारी होतील. हे तर आई - वडिलांचे वेड्यासारखे वागणे पाहूनच मुलेही वेडी झाली आहेत. कारण आईवडिलांचेच आचार, विचार, पद्धतशीर नाहीत. नवरा - बायको जर स्वत:च्या मुलांच्या उपस्थितीत येडेचाळे करीत असतील तर मुले बिघडणार नाहीत तर काय होणार ? मुलांवर कसे संस्कार पडतील ? काही मर्यादा तर असायला हवी ? या निखाऱ्याचे तेज कसे असते ? लहान मुले सुद्धा या निखाऱ्यांना घाबरतात ना ? आई - वडिलांचेच मन विचलित झालेले आहे. वाटेल तसे, समोरच्याचे मन दुखावले जाईल असे ते बोलतात, म्हणून मुले बिघडतात. तुम्ही असे बोलता की नवऱ्याला दुःख होते आणि नवरा असे बोलतो की तुम्हाला दुःख होते. असे हे सर्व 'पझल' (कोडे) तयार झाले आहे. हिंदुस्तानात असे होत नसते, पण या कलियुगाचा हा परिणाम आहे, म्हणून असेच असते. त्यातही हे एक आश्चर्यकारक विज्ञान उदयास आले आहे. हे विज्ञान जो प्राप्त करेल त्याचे कल्याण होईल !!
...म्हणून सदभावनांकडे वळा
प्रश्नकर्ता : मुले वाकडी वागतात अशा वेळी काय करावे ?