________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
घरात चार मुले असतील त्यापैकी दोघांची काहीच चूक नसेल तरीही बाप त्यांना रागवत असेल आणि ती दुसरी दोन मुले की जे नेहमीच चुका करतात त्यांना काहीच बोलत नसेल. असे सर्व घडते ते पूर्वीच्या रूटकॉजमुळे आहे.
अशी आशा तर बाळगूच नका प्रश्नकर्ता : मुलांना चिरंजीव का म्हणत असतील?
दादाश्री : चिरंजीव लिहिले नाही तर दुसरे शब्द घुसतील. आपला मुलगा मोठा व्हावा, सुखी व्हावा आपल्या मृत्युपूर्वी तो सुखी असलेला पाहावा, अशी भावना असते ना? तरी देखील मनात कुठेतरी अशी आशा असतेच की, म्हातारपणी त्याने माझी सेवा करावी. हे आंब्याचे रोपटे कशासाठी लावतात? आंबे खाण्यासाठी. पण आजकालची मुले, ही आंब्याची झाडे कशी आहेत? त्यांना दोनच आंबे येतील आणि बापाकडून दुसरे दोन आंबे मागतील. म्हणून (मुलांकडून) आशा-अपेक्षा ठेवूच नका.
एक गृहस्थ मला म्हणाले की माझा मुलगा मला सांगतो की 'तुम्हाला दर महिन्याला शंभर रुपये पाठवू का?' तेव्हा ते भाऊ म्हणाले 'मी तर त्याला सरळ सांगितले की, 'बेटा मला तुझ्या बासमती तांदुळाची गरज नाही, माझ्या इथे बाजरी पिकते त्याने माझे पोट भरते. हा (घेण्याचा) नवीन व्यवहार कशाला सुरु करू? जे आहे त्यात मी संतुष्ट आहे.'
मैत्री ती सुद्धा एक 'एडजस्टमेन्ट' प्रश्नकर्ता : मुलांना पाहुणे समजायचे का?
दादाश्री : पाहुणे समजण्याची गरज नाही. या मुलांना सुधारण्याचा हा एक मार्ग आहे, त्यांच्याशी मैत्री करा. आम्ही तर लहानपणापासूनच हा मार्ग निवडला होता. म्हणून माझी एवढ्याशा छोट्या मुलांबरोबर पण मैत्री आणि पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याशी पण मैत्री! मुलांशी मैत्रीचा