________________
क्लेश रहित जीवन
येईल?' मी म्हणालो, 'तुम्ही अशी मुले का आणलीत? निवडून निवडून चांगली मुले का नाही आणलीत?' सगळे हापूस आंबे सारखेच दिसतात, तरी पण आपण निवडून आणतो ना? पण तुम्ही दोन आंबट आणलेत, दोन खराब आणलेत, दोन बेचव आणलेत, आणि दोन गोड आणलेत. आता या आंब्याचा रस चांगला लागेल का? मागाहून भांडण-तंटा करण्यात काय अर्थ आहे? आंबट आंबे आणलेत, मग आंबटला आंबट
ओळखणे म्हणजे ज्ञान. चवीला आंबट आहेत ते फक्त पाहत राहायचे. तसेच या प्रकृतीला (स्वभावाला) पाहत राहायचे आहे. कोणाच्याही हातात काही सत्ता नाही. प्रत्येक अवस्था मात्र नैसर्गिक रचना आहे. यात कोणाचे काही चालत नाही, काहीही बदलत नाही, आणि पुन्हा हे 'व्यवस्थित आहे.
प्रश्नकर्ता : मारल्याने मुले सुधारतात का?
दादाश्री : कधीच सुधारत नाही, मारून कधीही सुधारत नाही. या मशीनला मारून पाहा बरे! ती तुटून जाईल. तसेच या मुलांच्या बाबतीत आहे. वरवर सुधारलेले वाटतात पण आतून तुटतात (निराश होतात.) दुसऱ्यांना एन्करेज (प्रेरित) करता येत नसेल तर मग मौन राहा ना, चुपचाप चहा प्या ना! सगळ्यांचे चेहरे पाहत राहा, हे दोन पुतळे भांडत आहेत त्यांना पाहत राहा. कारण हे आपल्या ताब्यात नाही. आपण फक्त यांना जाणणारेच आहोत.
___ ज्याला हा संसार वाढवायचा असेल त्याने संसारात भांडण-तंटे करावे, सर्व काही करावे. ज्याला मोक्षाला जायचे असेल त्याला एवढेच सांगतो की,' जे काय घडत आहे' त्यास फक्त 'पाहात' राहा. ___या जगात रागावून, काहीही सुधरणार नाही, उलट मनात अहंकार करतो की मी खूप रागवलो. रागावल्यानंतर पाहिले तर समोरच्यात काहीही बदल झालेला नसतो. पितळ पितळच राहील आणि कांसे कांसेच राहील. पितळाला मारत राहिलात तर ते काळे पडल्याशिवाय राहील का?