________________
क्लेश रहित जीवन
आमचे काम आहे, तुम्ही ते करू नका. तुम्ही आमच्या आज्ञेनुसार वागा. हे तर जो स्वतः सुधारलेला असेल तोच दुसऱ्यांना सुधारू शकतो. जो स्वतःच सुधारलेला नसेल तो दुसऱ्यांना काय सुधरणार?
मुलांना सुधारायचे असेल तर आमच्या आज्ञेनुसार वागा. घरात सहा महिने मौन बाळगा. मुलांनी विचारले तरच बोला आणि तरी देखील त्यांना सांगून ठेवा की मला नाही विचारले तर उत्तम. आणि मुलांबद्दल उलटसुलट विचार आले तर ताबोडतोब प्रतिक्रमण करून टाकावे.
'रिलेटिव्ह समजून वरपांगी राहावे मुलांना तर नऊ महिने पोटात ठेवायचे, मग लहान असे प्रर्यंत त्यांना चालवायचे, फिरवायचे, नंतर सोडून द्यायचे, या गायी-म्हशी देखील त्यांच्या वासरांना सोडून देतात ना? मुलांना पाच वर्षापर्यंत टोकावे लागते. नंतर टोकणेही बंद करा आणि वीस वर्षानंतर त्याची बायकोच त्याला सुधारेल. मग आपल्याला सुधारण्याची गरजही नाही.
मुलांबरोबर वरवरचा व्यवहार करा. खरे पाहिले कोणीच कोणाचे नाही. या देहाच्या आधारे मुले आपली आहेत असे वाटते.हा देह जळून जाईल तेव्हा सोबत येतो का कोणी? माझा-माझा म्हणून छातीशी कवटाळतात त्यांना तर खूप सोसावे लागते. अतिशय भावूक विचार कामात येत नाहीत. मुले तर व्यवहाराच्या आधाराने आहेत. मुलाला दुखले, भाजले तर जरूर उपचार करावा पण त्यासाठी रडण्याची काय गरज आहे?
सावत्र मुलांना मांडीवर घेऊन दूध पाजतात का? नाही. मग तसे ठेवा. हे 'कलियुग' आहे. सर्व रिलेटिव्ह संबंध आहेत. 'रिलेटिव्ह' ला रिलेटिव्हच्याच जागेवर ठेवा 'रियल' मध्ये आणू नका. जर 'रियल' संबंध असता तर मुलाला म्हटले असते की, 'तू जोपर्यंत सुधारत नाहीस तोपर्यंत वेगळा रहा.'