________________
क्लेश रहित जीवन
जास्त करतो. आणि काही मूर्ख पहाटे चार वाजता उठतात तरी काही काम करत नाहीत. मी सुद्धा प्रत्येक कामात उशीर करायचो. शाळेत जाताना सुद्धा शाळेतील घंटा वाजल्यानंतर घरून निघायचो आणि रोज गुरुजींचे बोलणे खायचो! आता गुरुजींना काय माहित की माझी प्रकृती कशी आहे ? प्रत्येकाचे (इंजिन) 'रस्टन' वेगळे, आणि 'पिस्टन' ही वेगवेगळे असते.
प्रश्नकर्ता : पण उशीरा उठण्यात शिस्त राहत नाही ना?
दादाश्री : तो उशीरा उठतो म्हणून तुम्ही जी कटकट करतात तीच खरी शिस्त नाही. तुम्ही कटकट करणे बंद करा. तुम्हाला ज्या-ज्या शक्ती हव्या आहेत त्या या दादांजवळ रोज शंभर वेळा मागा, सर्व मिळतील.
आता या भाऊला समजले म्हणून त्यांनी माझ्या आज्ञांचे पालन करणे सुरु केले आणि घरातील सगळ्यांनीच पुतण्याला बोलणे बंद केले. परिणाम असा झाला की, आठवड्याभरातच पुतण्या सात वाजता उठू लागला आणि घरात सगळ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू लागला!
दुसऱ्यांना सुधारण्यासाठी 'बोलणे' बंद करा
आजकालच्या काळात कमी बोलण्यासारखे उत्तम काहीच नाही. या काळात मनुष्याचे बोल हे दगड मारण्यासारखे निघत असतात, प्रत्येकाचे बोल तसेच असतात. म्हणून 'बोलणे' कमी करणे चांगले. कोणाला काहीही सांगण्यासारखे नाही. सांगितल्याने उलट जास्त बिघडते. आपण त्याला सांगितले की, गाडीवर जा, तर तो उशीरा जाईल. आणि जर काहीच सांगितले नाही तर वेळेवर जाईल. आपण नसलो तरी सर्व काही चालूच राहणार आहे. हा तर स्वतःचा खोटा अहंकारच आहे. ज्या दिवसापासून तुम्ही मुलांवर ओरडणे बंद कराल त्या दिवसापासून मुले सुधारू लागतील. तुमचे बोल चांगले निघत नाहीत म्हणून समोरच्याला द्वेषभाव होतो. तुमचे शब्द तो स्वीकारत नाही, उलट ते बोल परत