________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
___ परंतु हा तर रिलेटिव्ह संबंध आहे म्हणून 'एडजस्ट एव्हरीव्हेर.' तुम्ही दुसऱ्यांना सुधारण्यासाठी आलेले नाहीत, तुम्ही तर कर्माच्या तावडीतून सुटण्यासाठी आला आहात. सुधारण्यापेक्षा तर त्याच्यासाठी चांगली भावना करा. बाकी, कोणी कोणाला सुधारू शकत नाही. ज्ञानी पुरुष स्वतः सुधारलेले असतात तेच फक्त दुसऱ्यांना सुधारू शकतात. म्हणून त्यांच्याकडे घेऊन जा. मुले का बिघडतात? तर त्यांना सतत डिवचल्यामुळे. संपूर्ण जगाचे कामच डिवचल्यामुळे बिघडले आहे. या कुत्र्याला देखील डिवचले तर तो चावेल, लचका तोडेल. म्हणून लोक कुत्र्याला डिवचत नाहीत. मग मनुष्यांना डिवचाल तर काय होईल? ते पण चावतीलच. म्हणून कोणाला डिवचू नका.
या आमच्या एक-एक शब्दात अनंत-अनंत शास्त्र सामावलेली आहेत! हे समजून घेतले आणि त्याप्रमाणे सरळ झालात तर तुमचे कल्याणच होऊन जाईल! एकावतारी होऊ शकाल असे हे अदभूत 'विज्ञान' आहे! लाखो जन्म कमी होऊन जातील!! या विज्ञानामुळे राग समाप्त होईल आणि द्वेषही समाप्त होतील आणि वीतराग होता येईल. अगुरु-लघु स्वभाववाले व्हाल, म्हणून या विज्ञानापासून जेवढा लाभ घ्याल, तेवढा कमीच.
सल्ला द्यावा पण अनिवार्यपणे
माझ्यासारखे 'अबुध' झालात तर कल्याणच झाले समजा. बुद्धी वापरली म्हणून परत संसार उभा झाला. घरातील लोक विचारतील तेव्हाच उत्तर द्या, आणि त्यावेळी देखील मनात वाटले पाहिजे की यांनी काही विचारले नाही तर खूप बरे होईल. असा नवस धरावा. कारण त्यांनी विचारले नाही तर बुद्धीचा वापर करावा लागणार नाही. असे आहे, की आपले जुने संस्कार आता संपुष्टात आलेले आहेत. हा दुषमकाळ सगळीकडे जबरदस्त व्यापलेला आहे. याच्या प्रभावाने आपले सर्व संस्कार संपुष्टात आले आहेत. माणसांना कोणाला समजावून सांगताच येत