________________
फॅमिली ओर्गनायझेशन
हे पण लक्षात आले होते की, जगाला बदलण्याची सत्ता कोणाच्याही हातात नाही. म्हणून आम्ही काय सांगत असतो की, जमान्याप्रमाणे एडजेस्ट व्हा! मुलगा नवीन टोपी घालून आला तर त्याला असे म्हणू नये की ही कसली टोपी घेऊन आलास? तर त्याला म्हणावे की 'वाह!' किती छान टोपी, कुठून आणलीस? कितीला आणलीस? खूप स्वस्त मिळाली? अशाप्रकारे एडजेस्ट व्हा.
ही मुले दिवसभर कानाला रेडियो लावून बसत नाहीत का? कारण त्या बिचाऱ्यांच्या जीवनात हा नवीन रस उदयास आला आहे. हे यांचे नवीन डेव्हलपमेंट आहे. जर तो 'डेवलप' (प्रगतशील) झालेला असता तर कानाला रेडियो लावून फिरला नसता. एकदा बघितल्या नंतर त्याने त्याला परत हातच लावला नसता. नवीन वस्तू एकदा बघायची असते, त्याचा कायम अनुभव घेण्याची गरज नसते. ही तर त्याला कानाची नवीनच इंद्रिय मिळाली आहे. म्हणून दिवसभर रेडियो ऐकत राहतो! आता त्याची मनुष्यजन्माची सुरुवात झाली आहे. मनुष्यगतीत हजारो वेळा आलेला मनुष्य असे काही करणार नाही.
प्रश्नकर्ता : मुले सारखी बाहेर फिरत राहतात.
दादाश्री : मुले काही तुमच्याशी बांधलेली नाहीत. सर्वजण आपापल्या बंधनात आहेत. तुम्ही त्यांना एवढेच म्हणायचे की, 'वेळेवर ये' मग तो जेव्हा येईल ते 'व्यवस्थित.' व्यवहार सगळाच करा, पण कषाय रहित करा. व्यवहार कषाय रहित झाला तर मोक्ष, आणि कषाय सहित व्यवहार तर संसार.
प्रश्नकर्ता : माझा पुतण्या रोज नऊ वाजता उठतो आणि त्यामुळे काही काम होत नाही.
दादाश्री : आपण त्याला पांघरून म्हणावे की आरामशीर झोप भाऊ. त्याची प्रकृती वेगळी आहे म्हणून तो उशीरा उठतो. पण काम