________________
फॅमिली ओर्गेनायझेशन
दादाश्री : बरोबर आहे, पण आई-वडिलांसारखे वागून तसे बोलले पाहिजे, पण आजकाल आई-वडील आहेतच कुठे?
प्रश्नकर्ता : आई-वडील कुणाला म्हणायचे?
दादाश्री : आई-वडील त्यांना म्हणायचे की जरी मुलगा वाईट मार्गावर गेला असेल तरी सुद्धा, एखाद दिवशी आई-वडील त्याला म्हणतील, 'बेटा, हे आपल्याला शोभत नाही, हे तू काय केलेस?' त्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून तो सगळे वाईट मार्ग बंद करुन टाकेल! असे प्रेमच कुठे आहे? हे तर प्रेम नसलेले आई-वडील! हे जग प्रेमानेच वश होते. आजच्या आई-वडिलांना मुलांवर किती प्रेम आहे? तर गुलाबाच्या रोपट्यावर माळीला जेवढे प्रेम असते तेवढे! त्यांना आई-वडील कसे म्हणायचे? 'अनसर्टीफाईड फादर आणि अनसर्टीफाईड मदर'! मग मुलाची काय अवस्था होईल? खरे तर प्रथम टेस्टिंग करवून, 'सर्टीफिकेट' मिळवल्यानंतरच लग्नाची परवानगी दिली पाहिजे. जसे परीक्षेत पास झाल्याशिवाय, सर्टीफिकेट मिळवल्याशिवाय 'गवनॅमेन्टमध्ये' सुद्धा नोकरी देत नाही. तर मग इथेही सर्टीफिकेट मिळवल्याशिवाय लग्न कसे करू शकतो? ही आई आणि वडील बनण्याची जबाबदारी देशाच्या पंतप्रधानाच्या जबाबदारीपेक्षाही मोठी आहे. पंतप्रधानापेक्षाही सुद्धा उच्च पद आहे.
प्रश्नकर्ता : 'सर्टीफाईड' आई-वडील यांची व्याख्या काय?
दादाश्री : ‘अनसर्टीफाईड' आई-वडील म्हणजे स्वतःची मुले स्वतःच्या म्हणण्यानुसार वागत नाही, स्वतःची मुले स्वत:च्या आईवडिलांचा आदर करीत नाहीत, हैराण करतात! अशा आई-वडिलांना 'अनसर्टीफाईड' असेच बोलावे लागेल ना!
...नाही तर मौन धरून ‘पाहत' राहा
एक सिंधी भाऊ आले होते, ते सांगत होते की, 'माझा एक मुलगा असे करतो आणि दुसरा मुलगा तसे करतो, त्यांना कसे सुधारता