________________
वास्तवात दुःख आहे ?
वाटते, परंतु प्रत्यक्षात तसे नाही. तो करोडपती असला तरी स्वत:च्या मुलासाठी एक रुपयाची वस्तू घेताना सुद्धा खूप विचार करून करून घेतो. कोणत्याही करोडपतीच्या घरी तुम्हाला असे उघड्यावर पैसे पडलेले आढळले का? प्रत्येकाला पैसा प्राणाइतकाच प्रिय असतो.
आपल्या मनात सतत असा भाव असायला हवा की माझ्या मन-वचन-कायेने या जगातील कुठल्याही जीवाला किंचितमात्र पण दुःख न होवो.
प्रश्नकर्ता : पण सर्वसामान्य माणसाला असे वर्तन करणे फार कठीण आहे ना?
दादाश्री : मी तुम्हाला आजपासूनच असे आचरण करा असे म्हणत नाही. केवळ भावनाच करायला सांगत आहे. भावना म्हणजे तुमचा निश्चय.