________________
क्लेश रहित जीवन
तुम्ही करू शकता ना? असा प्रोजेक्ट तर करु शकता ना. जे बिलकुल असंभवच आहे असे करायला मी तुम्हाला सांगतच नाही.
...फक्त भावनाच करायची प्रश्नकर्ता : कुणालाच दुःख नाही, मग आम्ही जेव्हा दुसऱ्यांना दुःख देतो तेव्हा त्यांना का दुःख होते?
दादाश्री : त्यांच्या मान्यतेतून अजून दुःख गेले नाही. तुम्ही मला थोबाडीत माराल तर मला दु:ख होणार नाही पण दुसऱ्यांना मारले तर त्याला दु:ख होईलच, कारण मारल्याने दुःख होते, असे त्याच्या मान्यतेत आहे. 'रॉग बिलिफ' अजूनपर्यंत गेलेली नाही. 'कोणी मला मुस्कुटात मारली तर मला दु:ख होते,' त्याचप्रमाणे समोरच्यालाही दुःख होत असेल, या पातळीवरून विचार केला पाहिजे. कुणाला मुस्कुटात मारताना मनात हा विचार आला पाहिजे की, मला मुस्कटात मारले तर मला कसे वाटेल?
आपण कुणाकडून दहा हजार रुपये उसने आणले, पण दुर्दैवाने आपले दिवस फिरले तर मनात विचार येतील की, 'पैसे परत केले नाही तर त्यांना काय फरक पडणार आहे!' अशा वेळी न्यायपूर्वक विचार केला पाहिजे की 'माझ्याकडून कोणी पैसे घेतले आणि परत केले नाहीत तर मला कसे वाटेल?' असे झाले तर मला खूप दुःख होईल, त्याचप्रमाणे समोरच्यालाही दुःख होईल. म्हणून मलाही त्याचे पैसे परत करायचेच आहेत, असा निश्चय केला पाहिजे आणि असा निश्चय केला तर तुम्ही पैसे परत करू शकाल.
प्रश्नकर्ता : मनात असा विचार येतो की त्याच्याजवळ तर दहा करोड रुपये आहेत मग आपण त्याला दहा हजार रुपये परत केले नाहीत तर त्याला काही अडचण येणार नाही.
दादाश्री : त्याला अडचण येणार नाही असे तुम्हाला खुशाल