________________
[२] योग उपयोग परोपकारासाठी
जीवनात हीच दोन कार्ये महत्त्वाची मनुष्यजन्म कशासाठी आहे? स्वत:वर असलेले हे कायमचे बंधन तोडण्यासाठी आहे. 'एब्सोल्युट' होण्यासाठी आहे. आणि हे 'एब्सोल्युट' होण्याचे ज्ञान जर तुला प्राप्त झाले नाही तर तू दुसऱ्यांसाठी जगणे शिक. या दोनच गोष्टी करण्यासाठी हिंदुस्तानात जन्म झाला आहे; पण ही दोन कामे लोक करतात का? लोकांनी तर भेसळ करून मनुष्यजातीतून जनावरगतीत जाण्याची कला शोधून काढली आहे !
___ परोपकाराने पुण्याचे उपार्जन जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत केवळ पुण्यच मित्रासारखे काम करते आणि पाप हे शत्रूसारखे काम करते. तर आता तुम्हाला शत्रू हवा आहे की मित्र हवा आहे ? हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवायचे. तसेच मित्राचे संयोग कशाने जुळतील ते विचारा आणि शत्रूचे संयोग कशाने टळेल ते पण विचारा. जर शत्रू पसंत असेल तर तो कसा मिळवावा असे विचारलेत, तर त्यास आम्ही सांगू की वाटेल तेवढे कर्ज करून तूप पी, कुठेही भटक आणि जमेल तेवढी मौजमजा कर, मग पुढे काय होईल ते नंतर बघू आणि पुण्यरुपी मित्र हवा असेल तर आम्ही सांगू, की या झाडापासून काही शिक. कोणतेही झाड स्वत:चे फळ स्वतः खाते का? किंवा कोणतेही गुलाबाचे रोप स्वत:चे फूल स्वतः खाऊन टाकत असेल का? थोडे तरी खात असेल ना? जेव्हा आपण तिथे नसू, तेव्हा रात्री खात असेल, नाही का? खाते की नाही?