________________
योग उपयोग परोपकारासाठी
त्यांना कधी असे वाटतच नाही की चला एका मैलावर विश्वामित्री नदी आहे, मग तिथे जाऊन पाणी पिऊन येऊ.
२१
परोपकाराच्या परिणामाने लाभच
प्रश्नकर्ता : या संसारात सत्कृत्ये कशाला म्हणावी ? त्याची व्याख्या देता येईल का ?
दादाश्री : हो, चांगली कृत्ये तर सगळी झाडे पण करतात आणि ती अगदी चांगली कृत्येच करतात पण ते स्वतः कर्ता भावात नसतात. या झाडांमध्ये जीव असतो. ती सर्व स्वतःची फळे दुसऱ्यांना देतात. तुम्ही पण तुमची फळे दुसऱ्यांना देऊन टाका, तुम्हाला तुमची फळे मिळत राहतील. तुम्हाला जी फळे उत्पन्न होतात, शारीरिक फळे, मानसिक फळे वाचिक फळे ती सर्व लोकांना मोफत देत राहा. तर तुम्हाला लागणारी प्रत्येक गोष्ट तुम्हाला मिळत राहील. तुमच्या जीवन उपयोगी गरजांमध्ये किंचित देखील अडचण येणार नाही. मात्र जेव्हा ती फळे तुम्ही स्वतःच खाऊन घ्याल तेव्हा अडचण येईल. जर आंब्याच्या झाडाने स्वत:ची फळे स्वत:च खाल्ली तर झाडाचा मालक काय करेल ? तो ते झाड कापूनच टाकेल ना? लोक अशीच स्वतःची फळे स्वतःच खातात. इतकेच नाही तर वरून 'फी' सुद्धा मागतात! एक अर्ज लिहायचे बावीस रुपये मागतात ! ज्या देशात ‘फ्री ऑफ कॉस्ट' (मोफत) वकिली करत होते, इतकेच नाही तर आपल्या घरी नेऊन जेवायला घालून वकिली करत तिथे आता ही परिस्थिती झाली आहे. जर गावामध्ये भांडण झाले असेल तर नगरशेठ (सरपंच) त्या दोन्ही भांडणाऱ्यांना म्हणायचा 'चंदुलाल भाऊ, आज साडे दहा वाजता तुम्ही आमच्या घरी या आणि नगिनदास भाऊ, तुम्ही पण साडे दहा वाजता या.' आणि नगिनदासच्या ऐवजी कोणी मजूर असेल किंवा कोणी शेतकरी असेल की जे भांडत असतील त्यांना घरी यायला सांगायचा. दोघांना आपल्या शेजारी बसवून त्यांचात तडजोड करून दोघांना सहमत करायचा. ज्याचे पैसे चुकवायचे असतील त्याला थोडी