________________
क्लेश रहित जीवन
प्रश्नकर्ता : नाही खात.
दादाश्री : ही झाडे-झुडपे ती तर मनुष्यांना फळ देण्यासाठी मनुष्यांच्या सेवेत आहेत. आता त्यात झाडांना काय मिळते? तर त्यांची ऊर्ध्वगती होत असते आणि त्यांची मदत घेऊन माणसं पुढे विकास करतात! समजा, तुम्ही एक आंबा खाल्ला, त्यात त्या आंब्याच्या झाडाचे काय गेले? आणि तुम्हाला काय मिळाले? तुम्ही आंबा खाल्ला म्हणून तुम्हाला आनंद मिळाला. त्यामुळे तुमची जी वृत्ती बदलली, तिची किंमत अध्यात्म्यात शंभर रुपये मिळवल्यासारखी आहे. झाडाचा आंबा खाल्लात म्हणून त्यातले पाच टक्के तुमच्या वाट्यातून त्या आंब्याच्या झाडाला जातील आणि पंच्याण्णव टक्के तुमच्या वाट्याला येतील. म्हणजे ते झाड तुमच्या वाट्यातील पाच टक्के घेतात आणि बिचारे ऊर्ध्वगतीला जातात आणि तुमची पण अधोगती होत नाही, तुम्ही पण पुढे जाता. म्हणून ही झाडे म्हणतात 'आमचे सगळेकाही तुम्ही उपभोगा, प्रत्येक प्रकारची फळे-फूले उपभोगा.'
__म्हणून जर हा संसार तुम्हाला आवडत असेल, पसंत असेल, संसारिक वस्तूंची इच्छा असेल, सांसारिक विषयांचीच ओढ असेल तर फक्त एवढेच करा 'योग, उपयोग आणि परोपकारय' योग म्हणजे मन-वचन-काया यांचा योग आणि उपयोग म्हणजे बुद्धीचा उपयोग करणे मनाचा उपयोग करणे, चित्ताचा उपयोग करणे. या सगळ्यांचा दुसऱ्यांसाठी उपयोग करणे. समजा दुसऱ्यांसाठी खर्च नाही केला तरी आपले लोक शेवटी घरच्यांसाठी तरी वापरतातच ना! या कुत्रीला कशामुळे खायला मिळते? कारण त्या पिल्लांच्या आत भगवंत विराजमान आहेत आणि त्या पिल्लांची ती सेवा करते त्यामुळे तिला सर्व काही मिळते. या आधारावरच सगळा संसार चालत आहे. या झाडांना जेवण कुठून मिळते? या झाडांनी काही पुरुषार्थ केला आहे ? ते तर बिलकूल 'इमोशनल' नाहीत. 'इमोशनल' होतात का कधी? ते कधीही मागे-पुढे होत नाहीत.