________________
क्लेश रहित जीवन
ब्लडप्रेशर झालेला कावळा पाहिला का तुम्ही? एक हा मनुष्य नावाचा प्राणीच फक्त दुःखी आहे. फक्त मनुष्यालाच कॉलेजची गरज आहे.
या चिमण्या किती सुंदर घरटी बांधतात, त्यांना कोणी शिकवले? संसार चालविणे आपोआपच येते. हो, फक्त स्वरूपज्ञान प्राप्तकरण्यासाठीच पुरुषार्थ करण्याची गरज आहे. संसार चालविण्यासाठी कसलीच गरज नाही. मनुष्यच फक्त अतिशहाणा आहे. या पशु-पक्ष्यांना काय बायकामुले नसतात? त्यांना लग्न लावायला लागते का? फक्त माणसांनाच जणू बायका-मुले असतात. मनुष्यच लग्न लावण्याच्या मागे लागलेले आहेत, पैसे कमवण्याच्या मागे लागले आहेत. अरे! आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी मेहनत कर ना! इतर कशाच्याही मागे मेहनत-मजुरी करण्यासारखे नाही. आत्तापर्यंत जे काही केले ते दुःख साजरी करण्यासारखेच केले. या मुलांना चोरी करायचे कोण शिकवते? हे सगळे बीजरूपाने त्यांना मिळालेले आहे. या कडूनिंबाचे प्रत्येक पान कडू का आहे? कारण त्याच्या बीजातच कडवटपणा आहे. फक्त हा मनुष्यच सदैव दुःखी असतो; पण त्यात त्याचा दोष नाही. कारण चौथ्या आऱ्यापर्यंत सुख होते आणि हा तर पाचवा आरा (कालचक्राचा बारावा भाग) आहे. या आयचे नावच आहे दुषमकाळ ! म्हणून प्रचंड दुःख सोसून देखील समता उत्पन्न होत नाही. या काळाचे नावच दुषम. मग या दुषमकाळात सुषमकाळ शोधणे हे चुकीचे नाही का?