________________
क्लेश रहित जीवन
यासही दुःख नाही म्हणत, अडचण म्हणतात. हे तर संपूर्ण दिवस दुःखातच घालवतात. मनुष्य दिवसभर नवनवीन तरंग (कल्पना) करत राहतो. निरनिराळे तरंग करत राहतो!
एका व्यक्तीचा चेहरा थोडासा हिटलरसारखा होता. त्याचे नाक जरासे हिटलरसारखे होते. तो मनात असे मानू लागला की, आपण हिटलरसारखे आहोत! अरे वेडपट! कुठे हिटलर आणि कुठे तू? स्वतःला काय मानून बसलास? हिटलरने तर फक्त आरोळी जरी मारली तरी पूर्ण जग हादरून जायचे! आता अशा लोकांच्या कल्पनांचा अंत कसा येईल! ___म्हणजे वस्तूंची काही गरज नाही, हे तर अज्ञानतेचे दु:ख आहे. आम्ही 'स्वरूप ज्ञान' देतो त्यानंतर दुःख राहत नाही. आमच्या पाच आज्ञेत कुठे राहिले जात नाही तेवढेच तुम्ही पाहायचे! तुम्हाला खाणेपिणे सगळे वेळेच्यावेळी मिळत जाईल आणि ती पुन्हा 'व्यवस्थित शक्ती' आहे. दाढी जर आपोआप उगवते मग तसेच खाणे-पिणेही नाही का मिळणार? या दाढीची इच्छा नाही तरी पण ती वाढतेच ना! आता तुम्हाला जास्त वस्तूंची गरज नाही ना? जास्त वस्तूंचा किती त्रास होतो! तुम्हाला ‘स्वरूप ज्ञान' मिळण्यापूर्वी निरनिराळे तरंग येत होते ना? तरंगांना ओळखतात ना तुम्ही?
प्रश्नकर्ता : हो, तरंग येत होते.
दादाश्री : मनात निरनिराळे तरंग येतच असतात, या तरंगांना देवाने आकाश कुसुम म्हटले आहे. आकाश कुसुम कसे होते आणि कसे नव्हते? यासारखी गोष्ट आहे ! सगळेजण तरंग आणि अनंग या दोन्हीमध्येच गुंतलेले आहेत. असे सरळ थोबाडीत मारीत नाही, सरळ थोबाडीत मारणे हे पद्धतशीरचे म्हटले जाईल. पण मनातल्या मनात एकसारखे 'मी थोबाडीत मारेन, मी थोबाडीत मारेन' याप्रकारे अनंग थोबाडीत मारत राहतात. हे जग तरंगी भूतांमध्ये तडफडत राहते. असे झाले तर असे होईल आणि तसे झाले तर तसे होईल, सतत चालूच.