________________
जीवन जगण्याची कला
करतात पण इथे थोडेसे विदेशी 'हिप्पी' लोक काय आले तर लगेच लोकांनी त्यांची नक्कल सुरु केली! याला काय जगणे म्हणायचे?
'गुळ मिळत नाही, साखर मिळत नाही' यासाठी लोक आरडाओरडा करतात. खाण्याच्या वस्तूंसाठी एवढा आरडाओरडा का करावा? खाण्याच्या वस्तू तर तुच्छ् अगदी (साध्या) गोष्टी आहेत. पोट आहे म्हटल्यावर खाण्याचे मिळेलच. दात आहेत तेवढे अन्नाचे घास तर मिळतीलच. दात पण किती प्रकारचे आहेत! चिरण्याचे, फाडण्याचे, चावण्याचे, सगळे वेगवेगळे. हे डोळे, किती छान आहेत? करोड रुपये दिले तरी असे डोळे मिळतील का? नाही मिळणार. अरे, लाखो रुपये असतील तरी देखील हा दुर्दैवी म्हणेल की, 'मी दुःखी आहे.' स्वतःजवळ एवढ्या किमती वस्तू आहेत तरीही त्याची किंमत (महत्त्व) समजत नाही. फक्त डोळ्यांची किंमत समजून घे तरी तुला कळेल की तू किती सुखी आहेस.हे दात सुद्धा कधी ना कधी पडणारच आहेत, पण हल्ली तर कृत्रिम दात बसवून त्यांना पहिल्यासारखे बनवतात, पण ते काय चांगले दिसतात? भुतासारखे दिसतात. निसर्गाला पुन्हा नवीन दात द्यायचे असते तर दिले नसते का? लहान मुलांना नवीन दात देतोच ना?
__ या शरीराला गहू खाऊ घाला, डाळ खाऊ घाला, तरीही शेवटी तिरडीच! सर्वांचीच तिरडी निघते! शेवटी तर तिरडीच निघणार आहे. तिरडी म्हणजे निसर्गाची जप्ती. सगळे काही इथेच टाकून जायचे, आणि सोबत काय घेऊन जायचे? तर घरातल्यांसोबतची, गिहाईकांसोबतची, व्यापाऱ्यांसोबतची गुंतागुंत! भगवंताने तर बजावून सांगितले आहे की, 'अरे मानवा! तू समज, समज, समज. पुन्हा मनुष्य जन्म मिळणे महादुर्लभ आहे.'
या आजकालच्या काळात जीवन जगण्याची कला उरलीच नाही. मोक्षाचा मार्ग तर सोडा पण आनंदाने जीवन जगता तर यायला हवे ना?
हित कशात? हे निश्चित करावे लागते आमच्याजवळ तर व्यवहार जागृती निरंतर असते! माझ्याकडून