________________
जीवन जगण्याची कला
__ असा शौकची गरजच काय आहे?
संपूर्ण जग अनावश्यक वस्तूंचा परिग्रह (संग्रह) करण्यामध्येच गुंतलेले आहे. 'आवश्यक वस्तूंना देवाने परिग्रह म्हटले नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्याला नेमके काय आवश्यक आहे ते ठरवायला हवे. या शरीराला मुख्यत्वे कसली गरज आहे? तर मुख्य गरज हवेची. ती तर त्याला क्षणोक्षणी हवी तेवढी मुबलक आणि मोफत मिळते. नंतर पाण्याची गरज आहे. ते पण त्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळतच राहते. त्यानंतर गरज आहे अन्नाची. भूक लागते म्हणजे काय? तर आग. ही आग विझविण्यासाठी काय हवे? तेव्हा हे लोक म्हणतात श्रीखंड आणि बासुंदीच हवी आहे! अरे नाही, जे जवळ असेल ते टाक ना आत, म्हणजे भुकेची आग विझेल. कढी खिचडी टाकली तरीही विझेल. मग सेकंडरी स्टेजवर कोणाची गरज आहे? घालायला कपडे आणि राहायला निवारा पाहिजे. जगण्यासाठी 'मानाची' गरज आहे का? नाही. पण हा तर मानासाठी हापापलेला असतो आणि त्यातच मूर्छित होऊन जगतो. हे सर्व 'ज्ञानी' पुरुषांकडून समजून घेतले पाहिजे ना?
एक दिवस जर नळामधून साखर घातलेले गोड पाणी यायला लागले तर एका दिवसातच लोकांना वीट येईल, अरे! एका दिवसातच कंटाळलात? तर म्हणेल 'हो, मला तर साधे पाणीच हवे आहे' एखादी गोष्ट जेव्हा मिळेनाशी होते तेव्हाच त्या गोष्टीची किंमत कळते. लोक फॅन्टा-कोकाकोलाच्या मागे असतात. अरे तुला खरोखर कसली गरज आहे ते आधी समजून घे ना! तुला शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि रात्री खिचडी मिळाली तर शरीर काही तक्रार करणार आहे का? नाही. म्हणून खरे काय आवश्यक आहे ते प्रथम निश्चित करा. तेव्हा लोक तर एखाद्या विशिष्ट प्रकारच्या आईस्क्रीमलाच शोधत बसतील! कबीर साहेबांनी काय म्हटले आहे?
_ 'तेरा वेरी कोई नही, तेरा वेरी फेल!' (तुझा शत्रू कोणीही नाही, अनावश्यक भौतिकवाद, चंगळवाद हाच तुझा शत्रू)