________________
जीवन जगण्याची कला
औषधानेच त्याला मारले, देव मारत नाही. हे दुःख देणे किंवा दुसरी एखादी गोष्ट करणे, हे असे देव करत नाही. पुद्गल (जे पुरण आणि गलन होते)च दुःख देते. हे ढेकूण मारण्याचे औषध सुद्धा पुद्गलच आहे ना? तुम्हाला याचा अनुभव होतो की नाही? या काळातील जीव पूर्वविराधक वृत्तीवाले आहेत, पूर्वविराधक म्हटले जातात. पूर्वीच्या काळातील लोक तर खाण्याचे-पिण्याचे नसले, कपडे-लत्ते नसले तरीही चालवून घेत असत आणि आता तर कशाचीच कमी नाही, सगळी रेलचेल आहे तरी पण भांडणच भांडण! त्यातही नवऱ्याला 'सेल्स टॅक्स', 'इन्कम टॅक्सच्या' कटकटी. म्हणून तिथल्या साहेबांना नवरा घाबरणार आणि घरी बाईसाहेबांना विचारले की, तुम्ही कशाला घाबरतात? तेव्हा ती म्हणेल की 'माझा नवरा खूप तापट आहे.'
जीवनाला आवश्यक असणाऱ्या चार गोष्टी मिळाल्या असतील आणि तरीही ते कुरकुर करतात अशा सर्वांना मूर्ख, फुलीश म्हटले जाते. वेळेवर खायला मिळते की नाही मिळत? मग ते कसेही असो, तूप लावलेले किंवा बिन तुपाचे असो पण मिळते ना? वेळेवर चहा मिळतो की नाही? मग एकदा असो किंवा दोनदा असो, चहा मिळतो की नाही मिळत? आणि कपडे मिळतात की नाही मिळत? शर्ट-पॅन्ट, थंडीत घालण्यासाठी स्वेटर वगैरे मिळतात की नाही मिळत. राहण्यासाठी निवारा आहे की नाही? एवढ्या चार गोष्टी मिळून देखील कुरकूरत असतील अशा सगळ्यांना तुरुंगातच टाकायला हवे! एवढे असूनही एखाद्याची तक्रार असेल अशा व्यक्तीने लग्न करून घेतले पाहिजे. लग्नासंबंधी तक्रार असेल तर त्याला तुरुंगात टाकत नाही. वय झाले असेल त्याला लग्नासाठी मनाई केली जात नाही. या चार वस्तूंसोबत लग्नाचीही आवश्यकता आहे. पण लग्न करून देखील कित्येक जण लग्न मोडतात आणि नंतर एकटे राहतात आणि दु:खांना आमंत्रण देतात. झालेल्या लग्नाला मोडतात, कसली ही माणसं? या चार-पाच गोष्टी नसतील तर आपण समजू शकतो की या भाऊंना थोडीशी अडचण आहे आणि