________________
जीवन जगण्याची कला
घरातील सर्वांशी, शेजाऱ्यांशी, ऑफिसमध्ये सगळ्यांशीच समभावे निकाल करायचा. समजा ताटात जर नावडते जेवण आले तरी ते चिडचिड न करता समभावे त्याचा निकाल करा. कोणाला त्रास न देता, जे ताटात येईल ते निमूटपणे खाऊन घ्यावे. जे काही घडते तो संयोग आहे आणि भगवंताने सांगितले आहे की, जर तू संयोगाला धक्का मारशील तर शेवटी तो धक्का तुलाच लागेल ! म्हणून आमच्या ताटात नावडणारे पदार्थ जरी वाढले असतील तरी आम्ही त्यातले दोन पदार्थ खातोच. कारण नाही खाल्ले तर दोघांशीही भांडण केल्यासारखे होईल. एक म्हणजे ज्याने बनवून वाढले त्याच्याशी, त्याचा तिरस्कार होईल त्याला दुःख होईल. आणि दुसरे म्हणजे खाण्याच्या पदार्थाशी (अन्नाशी), ते ताटातील अन्न म्हणेल की मी काय गुन्हा केला ? मी तुझ्याजवळ आलो तर तू माझा अपमान का करतोस? तुला जेवढे जमेल तेवढे खा पण माझा अपमान करू नकोस. तेव्हा आपण अन्नाचा मान राखायला नको का ? आम्हाला नावडते मिळाले तरी आम्ही त्याचा मान राखतो. कारण काहीही सहजासहजी मिळत नसते आणि मिळते तेव्हा योग्य आदर केलाच पाहिजे. कोणी काही खायला दिले त्यास आपण जर नावे ठेवली तर सुख वाढेल का कमी होईल ?
१५
प्रश्नकर्ता : कमी होईल.
दादाश्री : ज्यामुळे सुख कमी होते असा व्यापार तर करणार नाही ना? सुख कमी होईल असा कुठलाच आपण व्यापार करता कामा नये. माझ्या ताटात पुष्कळ वेळा नावडत्या भाज्या असल्या तरीही मी त्या खातो आणि उलट म्हणतो आजची भाजी खूप छान झाली आहे.
प्रश्नकर्ता : यास मनधरणी केली असे नाही का म्हटले जाणार ? आवडत नसेल तरीही आवडते असे म्हणणे म्हणजे मनाची खोटी समजूत घालणे नाही का ?
दादाश्री : असे बिल्कुल नाही. एकतर आवडते म्हटले की ती