________________
वीर ज्ञानोदय ग्रन्थमाला
सगळे प्रयत्न करून वीरकुमारजी थकले होते. घरी आल्यानंतर गुरुवचनावर श्रद्धा ठेवून, भक्तीपूर्वक मंत्रजापाच्या अनुष्ठानास प्रारंभ केला.
आणि खरोखर चमत्कार घडला. एक दिवस सघालाख जापाचे अनुष्ठान पूर्व करून मंदिरातून घरी जात होते. रस्त्यांत एकाशी बोलता बोलता म्हणून गेले "आज माझे सघालाख जापाचे अनुष्ठान पूर्ण झाले. माझा मुलगा यायलाच पाहिजे. तसे पू० माताजी ने सांगितले आहे."
नेहेमी प्रमाणे भोजन करून वीरकुमारजी दुकानी येवून बसले. आज कामकाजांत त्यांचे लक्ष नव्हते. अस्वस्थ होवून ते सारखे रस्त्याकडे पहात. मुलाला पहाण्यासाठी त्यांची नजर आतुरली होती. आतुन पक्की खात्री होती की आज आपला मुलगा येणारच. आणि खरोखरच बरोबर दोन वाजता समोरून त्यांचा मुलगा दिलीपकुमार एका व्यक्ती बरोबर येत होता.
आश्चर्य। महान आश्चर्य. आपण स्वप्नात तर नाही ना? सत्य की भास? काही क्षण ते सभ्रमावस्थेत पडले. खरच कां माझा मुलगा आला? होय, खरे आहे ते अगदी खरे. आनंदाने ते बेहोस झाले.
समोर दिलीप उभा होता. डोळयावरचे केस अस्ताव्यस्त विखुरले होते. चेहरा सुकला होता. किती दिवसाचा भुकेला होता कोण जाणे? __ भावना सगळया उमळून आल्या. डोळयांत अश्रुधारा बरसू लागल्या. पटकन उठून त्यानी मुलाला हृदयाशी धरले आणि ते वेडयासारखे त्याचे मुके घेत सुटले. काहीवेळाने भावनांचा आवेग कमी झाल्यावर वीरकुमारजी गद्गदून म्हणाले. "धन्य तुमची माताजी। मला पूर्ण विश्वास होता की तुमचे वचन कधी असत्य ठरणार नाही. आजच सघालाख जाप पूर्ण झाले आणि माझा पुत्र स्वतः होवून घरी आला."
हे सगळे होई पर्यंत त्यांच्या दुकानापुढे शेकडो लोक जमले होते. तीन महिन्यापासून बेपत्ता झालेल्या पुत्राचे आणि डोययांत प्राण आणून त्याची वाट पहाणा-या पित्याचे हृदयंगम मीलन पाणावलेल्या डोळयानी पहात होते. दिलीप बरोबर आलेली व्यक्ती जवळच्याच गांवातली होतो. तो म्हणाला. "काल दुपारी हा माझ्या घरी अचानक आला. कुठुन भटकत भटकत आला कुणास ठाऊक? याची सगळी ओळख काढून याला मी तुमच्या जवळ घेवून आलो."
सर्वानी त्याला लाख लाख दुवा दिल्या. पुत्रशोकाने दुःखित झालेल्या परिवारामध्ये त्याने पुनः चैतन्य आणले. आनंद आणला. नंतर दिलीपनेहीतीन महिन्यात काय घडले हे सांगायला सुख्खात केलो.
मुलगा घरी आल्यानंतर वीरकुमारजीनी प्रथम मला पत्र लिहले. आणि थोडयाच दिवसांत ज्ञानमती माताजींच्या जवळ मुलाला दर्शनासाठी घेवून आले.
बंधुनो हे पुरगुरुशक्तीचे आणि त्यानी दिलेल्या मंत्राच्या अनुष्ठानाचे फळ आहे. आज दिलीपकुमार अगदो व्यवस्थित आहे. कसलीही विकृति त्याच्या मध्ये नाही. बेलहरामध्ये आपल्या वडिलाना, कापड दुकानांत कुशलतेने मदत करीत आहे. आपल्या आई वडिलांच्या जवळ आनंदाने रहात आहे.
मंत्रतंत्राची साधना आचार्यनी शास्त्रामध्ये लिहून ठेवलेलीच आहे. तरी लिहून देखील प्रत्यक्ष गुरुमुखातूनच मंत्र प्राप्त करावेत. नाहीतर अनर्थ होण्याची शक्यता असते. डॉक्टर एखाद्या रोग्याला तपासून, त्याची नाडी परिक्षा करून त्याला योग्य असेल तेच औषध देतात, आणि तेच औषध रोग्याला लागू पडते. स्वतः पुस्तकात वाचून मनाने औषध घेणे रोग्याला हितकारक नसते. त्याचप्रमाणे गुरुदेव, शिष्याची समस्या समजावून घेवून त्याला अनुकूल असेच मंत्रतंत्र देतात. गुरुदेव सांगतील तसे मंत्राचे अनुष्ठान केले तरच मंत्र फलीत होते. कुठल्याही पुस्तकांत वाचून स्वतःच्या मनाने मंत्राचे जाप कधीही करू नयेत. माझी अशी गाढ श्रद्धा आहे की गुरुदेवानी दिलेल्या मंत्राच्या पाठीशी त्यांच्या तपस्येचे सामर्थ्यही उभे असते. म्हणूनच त्यांच्या आशीर्वादाने त्यांचे मंतर फलदायी होतात.
पु० माताजीनी कुठल्याही रोग्याच्या मस्तकावर आपला पिछी आशीर्वाद स्वरूप ठेवली तर ती व्यक्ती रोगमुक्त होवून जाते हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे, अनुभवलेले आहे. दूरदूरच्या प्रदेशांतून माताजींचे भक्तगण त्यांच्या दर्शनार्थ हस्तिनापूरला सतत येतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून सन्तुष्ट होवून जातात.
अगदी अलीकडची एक ताजी घटना आहे. सीतापुरचे नरेन्दरकुमार जैन व त्यांची पत्नी श्रीमती किरणदेवी यांचा दहा वर्षाचा मुलगा धनेंद्रकुमार जैन गत वर्षापासून नेत्ररोगाने बेजार झाला होता. त्याच्या एका डोळयाची दिसण्याची क्षमता कमी होत चालली होती. खूप उपचार केले. कांही फरक अपडेना. शेवटी डॉक्टरांच्या सलयाने डोळयाचे ऑपरेशन केले. ऑपरेशन करूनही फायदा झाला नाही. आलेले अंधत्व तसेच होते. मुलगा तर वेदनेने तळमळत होता. आई वडिलानी शेवटी गंडेदोरे, ताईत, हकीम दुवा असले उपाय केले. परंतु सगळे कांही व्यर्थ गेले. कित्येकानी भूतपिशाच्याची बाधा झाल्याचे सांगितले. परंतु त्यावर काय करावे हेत कुणाला सुचत नव्हते. मातापिता अत्यंत दुःखी झाले. श्रीमती किरणदेवी ही माझ्या गांवची असल्यामुळे तिचा माझा चांगलाच परिचय होता. ४/५ महिने प्रयत्न करूनही आपल्या मुलात काही सुधारणा होत नाही हे पाहून तिने मला पत्र लिहिले. आणि माताजींना सांगून हे संकट दूर करावे अशी विनवणी केली.
मी० पू० माताजींना सर्व हकीकत सांगितली. माताजींनी किरणदेवीला हस्तिनापूरला बोलावून घेतले. किरणदेवीला माताजींनी आशिर्वादपूर्वक
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org