________________
गणिनी आर्यिकारत्न श्री ज्ञानमती अभिवन्दन ग्रन्थ
[३६१
ते करू शकत. त्यांच्या चरणी शरण आलेल्या कित्येकांचे भयंकर रोग त्यांच्या तपस्येच्या प्रभावाने नाहिसे होत. परंतु आज पंचमकालातील हीन संहनननामुळे तेवढी कठोर तपस्या होवू शकत नाही. तरी देखील अखंड ब्रह्मचर्य, रत्नमयाची निर्दोष साधना करणा-या साधुंच्या तपस्येचा प्रभाव दिसल्याशिवाय रहणार नाही. पू० ज्ञानमती माताजीनी आपल्या जीवनांत पुरुषार्थाला सदैव प्रधानता दिलेली आहे.
सन् १९८२ ची गोष्ट. दिल्लीमध्ये जम्बूद्वीप ज्ञानज्योतीच्या प्रवतैनाची चर्चा चालली होती. अहिसेचा देशव्यापी प्रचार करण्याच्या दृष्टीने, त्यावेळचे प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते ज्ञानज्योति प्रवर्तनाचे उद्घाटन करावे अशी सर्वाची इच्छा होती. परंतु त्याचवेळी काही ज्योतिषानी येवून सांगितली की "उद्घाटनाला" प्रधानमंत्री इंदिरा गांधी येण्याचा योग नाही. सर्व कार्यकर्ते हताश झाले, निराश झाले. परन्तु माताजीनी त्याना धीर दिला. त्या म्हणाल्या "तुम्ही सुमचा पुरुषार्थ करा. माझा आशीर्वाद आहेच. तुमच्या कार्यात तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.
आणि खरोखरच माताजींची वाणी सत्य ठरली. ४ जून १९८२ या दिवशी इंदिराजींनी लाल किल्ला मैदानांत येऊन ज्ञानज्योतीचे उद्घाटन केले. तेथे जमलेल्या विशाल जनसमुदायासमोर भाषणहो केले. बिच्चारे ज्योतिषी ज्यांनी इंदिराजी येणार नाहीत असे भविष्य वर्तविले होते ते त्यानंतर कित्येक दिवस माताजींना तोंड दाखवू शकले नाहीत. ज्योतिष वचनापेक्षा गुरुवचनाचा प्रभाव, महिमा, सत्यता अधिक असते याची प्रचिती देणा-या अनेक घटना माजींच्या आयुष्यात घडल्या आहेत.
माताजींच्या आशिर्वादाने नैसर्गिक आपत्तीही टळल्या हस्तिनापूर येथे जंबुद्वीप निर्मितीचे काम चालू होते. ८४ फूट मेरुपर्वत उभा करताना इंजिनियर साहेब जय दिवशी लिंटर टाकण्याचा दिवस ठरवीत त्या दिवशी आकाश काळया ढगाने गच्च भरून जाई. कुठल्याही क्षणी मुसळधार पाऊस पडेल असे वाटे. काम स्थगित करावे लागेल की काय असे वाटे. ब्र० मोतीचंद, रवींद्रकुमार माताजींना प्रार्थना करीत. "माताजी। आशिर्वाद द्यावा. जर लिंटर टाकताना पाऊस पडला तर सगळे काम मातीत जाईल.
माताजी आश्वासन देत म्हणत- 'काळजी करू नका. निश्चिंत रहा. सगळे काही ठिक होईल.'
आणि आश्चर्य असे की जेंव्हा जेंव्हा लिंटर टाकले जाई तेंव्हा पाऊस पडायचा नाही. नंतर पडायचा. इंजिनियर साहेब म्हणत हा पाऊस अमृतासारखा आहे. केलेले काम पक्के होऊन जाईल. याप्रमाणे संपूर्ण सुमेरु उभा होईपर्यंत त्यावर पाणी टाकण्याची जास्त आवश्यकता पडली नाही. हे सर्व माताजींच्या आशीर्वादाचेच फल होय.
पू० माताजी अत्यंत उदार हृदयी आहेत. आपल्या आशिर्वादाचा कृपाप्रसाद देताना गरीब श्रीमंत, शत्रुमित्र, जैन अजैन असा कधीही भेदभाव केला नाही. सूर्य ज्या प्रमाणे आपल्या किरणांचा वर्षाव सर्वाच्यावर सारखाच करतो त्याप्रमाणे माताजी आपल्या आशिर्वादरूप कारुण्याचा वर्षाव सर्वाच्यावर सारखाच करीत. समताभाव हा त्यांचा स्थायी भाव आहे.
प्रकरण ७
दीपक ज्याप्रमाणे स्वतः जळून दुस-याला प्रकाश देतो, चंदन जहरील्या नागानी डसल्यावर देखिल सुगंधच देतो, त्याचप्रमाणे पू० ज्ञानमती माताजींनी कोणत्याही परिस्थितीत सदैव परोपकार करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता मानली आहे.
__ कुमारी मुली, विवाहित स्त्रिया, विधवा महिला या तर संसाराच्या चिखलातून काढून मोक्षमागारला लावले, त्याचबरोबर तरूण मुले, प्रौढ पुरुष यांनाही शिकवून त्यागाच्या सर्वोच्च शिखरावर नेऊन बसविले. चरित्र चक्रवर्ती आचार्यश्री शांतीसागरजी महाराजांचे चौथे पट्टाधीश आचार्यश्री अजितसागरजी महाराज हे याचे जिवंत उदाहरण आहे. बाल ब्र० श्री राजमल याना सन् १९५८-५९ मध्ये राजवर्तिक गोम्मटसार, कर्मकांड, पंचाध्यायी वगैरे ग्रंथांचे अध्ययन करायला लावले आणि दीक्षा घेण्याविषयी सतत प्रेरणा देत राहिल्या. सतत संबोधन करीत राहिल्या. त्याचे फलस्वरूप म्हणजे ब्र० श्री राजमल यांनी १९६१ मध्ये सीकर [राज०] येथे आचार्य श्री शिवसागर यांच्याकडून मुनि दीक्षा घेतली. आणि तेच आचार्यश्री अजितसागरजी होय. ज्यावेळी त्यांनी मुनीदीक्षा घेतली त्याक्षणी माताजींनी नम्रतेने त्यांना नमोस्तु करण्यास प्रारंभही केला. जैनधर्मात जिनलिंग असा मुनीवेश सर्वात पूज्य मानलला जातो.
परमपूज्य आचार्यकल्प श्री श्रुतसागरजी महाराज नेहमीच म्हणत की, "पारसमणीलोखंडाचे फक्त सोन्यांत रूपांतर करते. पण स्वतःसारखे पारस बनवित नाही. परंतु ज्ञानमती माताजी या अशा विलक्षण "पारसमणी" आहेत की जो लोखंडाला सोनेच नाही पण पारस बनवून टाकतात. माताजी, आपल्याच शिष्यांची नाहीतर इतरानचीही उन्नती झालेली पाहून अत्यंत प्रसन्न होऊन जातात. ज्यावेळी उदयपूर येथे, १९८७ च्या वेळी, मुनीश्री अजितसागरजी महाराज यांना आचार्यपद प्रदान करण्याचा सोहळा झाला त्यावेळी माताजी हस्तिनापूर येथे होत्या. तेथूनच त्यांनी प्रसन्न होऊन महाराजांच्या दीर्घायुसाठी, आचार्यपदाची उज्जव परंपराअखंडित राहण्यासाठी मनोभावे शुभकामना करीत होत्या.
पू० माताजींच्या शिष्या आर्यिका जिनमती माताजी, आदिमती माताजी यांनी माताजींच्या जवळच धर्माध्यायन केले आणि त्यांनी, प्रमेयकमलमार्तण्ड
Jain Educationa international
For Personal and Private Use Only
www.jainelibrary.org