Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
४० अनाहूतः प्रविशति अपृष्टो बहु भाषते ।
अविश्वस्ते विश्वसिति मूढचेता नराधमः ॥ ५॥३३॥३६ मूर्ख मनुष्य कोणी न बोलावितांच प्रवेश करतो, विचारल्यावांचून बडबडत सुटतो, आणि विश्वासास पात्र नसलेल्यावर विश्वास ठेवतो. ४१ अनित्यं यौवनं रूपं जीवितं द्रव्यसंचयः।
आरोग्यं प्रियसंवासो गृध्येत्तत्र न पण्डितः॥१२॥३३०१४ तारुण्य, रूप, जीवित, द्रव्यसंचय, आरोग्य व प्रियजनांचा सहवास ही सर्व अशाश्वत आहेत. शहाण्या पुरुषाने त्यांचा लोभ धरूं नये. ४२ अनित्यचित्तः पुरुषस्तस्मिन्को जातु विश्वसेत् ।
तस्मात्प्रधानं यत्कार्यं प्रत्यक्षं तत्समाचरेत् ॥१२।८०९ मनुष्याचे मन फार चंचल आहे. त्याच्यावर कोण विश्वास ठेवील ? ( कोणाची बुद्धि केव्हां कशी पालटेल याचा काय नेम ? ) यासाठी, जे काम महत्त्वाचे असेल ते स्वतःच करावें. ४३ अनिर्वेदः श्रियो मूलं लाभस्य च शुभस्य च ॥५।३९।५९ लक्ष्मी, लाभाचे आणि कल्याणाचें मूळ सतत उद्योग करणे हे आहे. ४४ अनिदेन दीर्पण निश्चयेन ध्रुवेण च ।
देवदेवप्रसादाच्च क्षिप्रं फलमवाप्यते ॥१२॥१५३।११७ दीर्घोद्योगानें, दृडनिश्चयाने व ईश्वरी कृपेनें सत्वर कार्यसिद्धि होते. ४५ अनिष्टं सर्वभूतानां मरणं नाम भारत । __मृत्युकाले हि भूतानां सद्यो जायति वेपथुः॥१३॥११६।२७
( भीष्म धर्मराजाला सांगतात.) खरोखर कोणत्याहि प्राण्याला मरण नकोसे वाटते. मृत्युकाल जवळ आला की सर्वांना कापरे भरतें ! .
४६ अनीशश्वावमानी च स शीघ्रं भ्रश्यते श्रियः॥१०।२।२५ हातांत सत्ता नसतांना जो दुसऱ्याचा उपमर्द करतो तो ऐश्वर्यापासून लवकरच भ्रष्ट होतो.
For Private And Personal Use Only