Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२६ अधनस्य मृतं श्रेयः ।। ६।९६६ निर्धन मनुष्याला मरण श्रेयस्कर ! २७ अधनाद्धि निवर्तन्ते ज्ञातयः सुहृदो द्विजाः । ___अपुष्पादफलाद्वक्षाद्यथा कृष्ण पतत्त्रिणः ।। ५।७।२०
ज्याप्रमाणे पक्षी पुष्परहित व फलरहित वृक्षाचा त्याग करतात त्याप्रमाणे दरिद्री मनुष्याचे नातलग व इष्टमित्र त्याला सोडून जातात.
२८ अधनेनार्थकामेन नार्थः शक्यो विधित्सितुम् । ____ अर्थैरा निबध्यन्ते गजरिव महागजाः ॥ १२८।२०
धनाची इच्छा करणाऱ्याला, आरंभी थोडेतरी धन जवळ असल्याशिवाय, धन मिळणे शक्य नाही, हत्ती पकडण्यास जशी हत्तीचीच योजना करावी लागते, तसें द्रव्यानेच द्रव्य मिळवावे लागते. २९ अधर्मः क्षत्रियस्यैष यच्छय्यामरणं भवेत् ॥ १२९७।२३ अंथरुणावर पडून मरणे हा क्षत्रियाचा धर्म नव्हे. ३० अधर्मरूपो धर्मों हि कश्चिदस्ति नराधिप ।
धर्मश्चाधर्मरूपोजस्ति तच्च ज्ञेयं विपश्चिता ॥ १२॥३३॥३२ ( व्यास महर्षि युधिष्ठिराला सांगतात.) हे राजा, केव्हां केव्हां धर्माला अधर्माचें रूप येतें, व अधर्माला धर्माचे स्वरूप येत असते. हे ससजून घेणे शहाण्या पुरुषाचें काम आहे. ३१ अधर्मो धर्मतां याति स्वामी चेद्धार्मिको भवेत् ।
स्वामिनो गुणदोषाभ्यां भृत्याः स्युर्नात्र संशयः॥११।८।३३ मालक जर धर्मनिष्ठ असला व सेवक अधार्मिक असला तरीसुद्धां धार्मिक बनतो. धन्याच्या आंगच्या गुणदोषांप्रमाणे चाकरांच्या ठिकाणी गुणदोष उत्पन्न होतात यांत संशय नाही. ३२ अध्रुवा सर्वमयेषु श्रीरुपालक्ष्यते भृशम् ॥ ९६५/२० सर्व मनुष्यांचे ऐश्वर्य पूर्ण अशाश्वत आहे असे दिसून येते.
For Private And Personal Use Only