Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
३३ अनन्तं बत मे वित्तं यस्य मे नास्ति किंचन ।।
मिथिलायां प्रदीप्तायां न मे दह्यति किंचन ॥ १२॥१७/१९ ( जनकराजा म्हणतो. ) खरोखर माझें ऐश्वर्य अनंत ( अविनाशि ) आहे; कारण माझी कशावरहि ममता नाही. साऱ्या मिथिला नगरीला आग लागली तरी त्यांत माझें असें कांहीहि दग्ध व्हावयाचें नाहीं. ३४ अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जनाः पर्युपासते। .
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥ ६॥३३२२२ [ भगवान् श्रीकृष्ण सांगतात ] जे लोक अनन्यनिष्ठेने माझें चिंतन करून मला भजतात, अशा नित्य माझी भक्ति करणाऱ्या लोकांचा योगक्षेम मी चालवीत असतो. ३५ अनहते यद्ददाति न ददाति यदहते ।
अनिर्हापरिज्ञानादानधर्मोऽपि दुष्करः ॥ १२।२०।९ दानाला पात्र कोण व अपात्र कोण हे न समजल्याने कोणी अपात्री दान करतो आणि सत्पात्री करीत नाही. तस्मात् दानरूप धर्म सुद्धा मोठा कठीण आहे. ३६ अनागतविधाता च प्रत्युत्पन्नमतिश्च यः।
द्वावेव सुखमेधेते दीर्घसूत्री विनश्यति ॥१२॥१३७१ पुढे येणाऱ्या संकटाची आधी तरतूद करून ठेवणारा, व प्रसंग पडतांच ताबडतोब ज्याला युक्ति सुचते तो, अशा दोन प्रकारच्या मनुष्यांनाच सुखाचा लाभ होत असतो. दीर्घसूत्री सर्वथा नाश पावतो. ३७ अनायुष्यं दिवा स्वप्नं तथाभ्युदितशायिता॥१३॥१०४।१३९ दिवसा झोप घेणे आणि सूर्योदयाचेवेळी निजणे ही आयुष्याची हानि करणारी आहेत. ३८ अनारम्भात्तु कार्याणां नार्थः संपद्यते कचित् ॥१०।२।३४ केव्हांहि कार्याला आरंभ केल्याशिवाय कोणतीहि गोष्ट साध्य होत नसते. ३९ अनार्याचरितं तात परस्वस्पृहणं भृशम् ॥ २।५४।६ (धृतराष्ट्र दुर्योधनाला म्हणतो.) बाबा, परद्रव्याचा अभिलाष धरणे हे केव्हांहि आर्य मनुष्याचे ब्रीद नव्हे.
For Private And Personal Use Only