Book Title: Sarth Mahabharat Subhashitani
Author(s): Vishnu Vinayak Paranjape, Chintaman M Paranjape
Publisher: Keshav Bhikhaji Dhavle
View full book text
________________
Shri Mahavir Jain Aradhana Kendra
www.kobatirth.org
Acharya Shri Kailassagarsuri Gyanmandir
सार्थश्रीमहाभारतसुभाषितानि
२१ अदत्तस्यानुपादानं दानमध्ययनं तपः ।
अहिंसा सत्यमक्रोध इज्या धर्मस्य लक्षणम् ॥१२॥३६।१० कोणी देईल तेवढ्याचाच स्वीकार करणें, दान, अध्ययन, तप, अहिंसा, सत्य भाषण, क्रोध नसणे आणि यज्ञ करणे ही धर्माची लक्षणे होत. २२ अद्रोहसमयं कृत्वा चिच्छेद नमुचेः शिरः।
शक्रः, साभिमता तस्य रिपौ वृत्तिः सनातनी ॥२।५५।१३ (दुर्योधन शकुनीला म्हणाला. ) — मी तुझ्याशी द्रोह करणार नाही' अशी प्रतिज्ञा करून इंद्राने नमुचि दैत्याचा शिरच्छेद केला. शत्रूशी वागण्याची ही त्याची रीति पूर्वापार चालत आलेली असून सर्वसंमत आहे. २३ अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा ।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते ॥ १२॥१२४१६६ कृतीने, मनाने व वाणीने कोणत्याहि प्राण्यास त्रास न देणे, परोपकार करणे आणि दान करणे या प्रकाराचे शील प्रशस्त होय.
२४ अद्रोहेणैव भूतानामल्पद्रोहेण वा पुनः। ___या वृत्तिःस परोधर्मस्तेन जीवामि जाजले ॥१२।२६२।६
( तुलाधार वैश्य जाजलि ब्राह्मणाला म्हणतो. ) हे जाजले, कोणत्याहि प्राण्यास मुळीच उपद्रव न देतां, अथवा [ प्रसंगच पडल्यास ] अगदी थोडी पीडा देऊन आपला निर्वाह करणे हा श्रेष्ठ प्रकारचा धर्म होय, त्याचेच अवलंबन करून मी रहात असतो. २५ अधनं दुर्बलं प्राहुर्धनेन बलवान्भवेत् ।
सर्वं धनवता प्राप्यं सर्वं तरति कोशवान् ॥१२॥१३०।४९ निर्धनाला दुबळा समजतात, धनाने मनुष्य बलसंपन्न होतो. सर्व काही धनसंपन्न असलेल्याला प्राप्त करून घेता येते. द्रव्याचा खजिना ज्याच्यापाशी आहे तो सर्व [ आपत्ति ] तरून जातो.
For Private And Personal Use Only