________________
गुरु-शिष्य
दादाश्री : पण कदाचित या जन्मात ते गुरू भेटणारही नाहीत व तशी गरज सुद्धा नसेल आणि नंतर पुढच्या जन्मी परत ते भेटूही शकतात.
पण असे आहे की, आता यापुढे तर बराच मार्ग चालायचा बाकी आहे, तेव्हा अजून तर अनेक गुरू करावे लागतील. जोपर्यंत मोक्ष मिळत नाही तोपर्यंत गुरूंची गरज भासेल. यथार्थ समकीत झाल्यानंतर गुरूची गरज उरत नाही. ही काही नुसती थाप नाही. गुरूशिवाय तर चालणारच नाही.
'गुरू अनावश्यक,' ही चुकीची गोष्ट प्रश्नकर्ता : कित्येक संत असे म्हणतात की गुरू करण्याची आवश्यकता नाही.
दादाश्री : 'गुरूची आवश्यकता नाही' असे म्हणणारे त्यांची स्वत:ची गोष्ट करतात. लोक ही गोष्ट स्वीकारणार नाहीत. संपूर्ण जग गुरूचा स्वीकार करतो. गुरू वाईट असेल असे कधीतरी घडते. पण म्हणून 'गुरू' शब्दच काढून टाकणे, असे तर चालणारच नाही ना!
प्रश्नकर्ता : पुष्कळ लोक गुरू करतच नाहीत.
दादाश्री : गुरू करत नाहीत असे कधी घडतच नाही. काही लोकांनी 'गुरू करू नका' असा उपदेश दिला, तेव्हापासूनच हिंदुस्तानात असे झाले आहे. नाही तर हिंदुस्तान देशाने तर आधीपासूनच गुरूला मान्य केले आहे की कोणी का असेना पण एक गुरू तरी करावा.
चुकीचे शिकवले, तोही गुरूच प्रश्नकर्ता : गुरू असतील किंवा नसतील, या दोन्हींमध्ये काय फरक आहे?
दादाश्री : गुरू नसतील तर रस्त्याने चालता-चालता समोर सात रस्ते आले तर तुम्ही कोणत्या रस्त्याने जाल?
प्रश्नकर्ता : ते मग मन ठरवेल, तोच रस्ता पकडू.