________________
११४
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : मग टेस्ट आणि परीक्षेत काय फरक आहे?
दादाश्री : टेस्टमध्ये आणि परीक्षेत पुष्कळ फरक आहे. टेस्टमध्ये तर आम्ही इतकेच सांगायचे की, 'साहेब, तुम्ही हे सर्व सांगितलेत, परंतु मला तर एकही गोष्ट खरी वाटत नाही.' इतकेच बोला. त्याची टेस्ट एकदमच होईल. ते फणा उभारतील. मग आम्ही समजू की हा तर फणाधारी साप आहे, तेव्हा हे दुकान आपल्यासाठी (योग्य)नाही. दुकान बदला. दुकान बदलण्याचे आपल्याला नाही का कळणार?
प्रश्नकर्ता : परंतु दादा, गुरूला असे सांगणे हा अविनय नाही म्हटला जाणार?
दादाश्री : असे आहे, की अविनय केला नाही, तर आम्ही कुठपर्यंत असेच्या असे बसून राहणार? आम्हाला सिल्क हवे आहे, 'डबल घोडा' कंपनीचे सिल्क हवे आहे, त्यासाठी प्रत्येक दुकानात फिरुन-फिरुन बघितले, तेव्हा कोणी म्हणेल की, भाऊ, त्याच्या दुकानात, त्या खादी भंडारात जा'. मग त्या दुकानात जाऊन आपण बसून राहिलो पण काही विचारले वगैरे नाही, तर तिथे किती वेळ बसून राहायचे? त्यापेक्षा तुम्ही विचारा की, 'भाऊ, तुमच्याकडे डबल घोड्याचे सिल्क असेल तर मी येथे बसतो. मग सहा तास बसून राहीन, पण ते आहे का तुमच्याकडे? तेव्हा तो म्हणतो 'नाही' मग आपण उठून दुसऱ्या दुकानात जाऊ.
तरी पण येथे एक गुन्हा तर होतोच. माझ्या या समजुतीचा आधार घेऊन सटकायचे नाही. ज्याला तुम्ही असे म्हटले की, 'तुमचे हे ठीक नाही' त्यामुळे त्याचे मन तर दुखावले गेले, तेवढ्यापुरता तो अविनय धरला जातो. म्हणून त्यांना सांगा की, 'साहेब, कधी-कधी माझे डोके जरा फिरते' मग ते म्हणतील, 'काही हरकत नाही, काही हरकत नाही' तरी पण त्यांना दुःख वाटत असेल तर मग आपल्याला पाच-पन्नास रुपये खिशात ठेवावे लागतात आणि त्यांना विचारावे लागते की 'तुम्हाला चष्मा वगैरे काही हवा आहे का? जे काही पाहिजे असेल ते सांगा' नाही तर मग आपण म्हणावे 'साहेब, एक शाल आहे, त्याचा स्वीकार करा. माझ्या डोक्यावर हात ठेवा.' ती शाल दिली म्हणजे ते खुश! मग आपल्याला