________________
गुरु-शिष्य
१४५
प्रश्नकर्ता : समजा आजपासून आपणास खरे गुरू मानले आणि समर्पण केले तर?
दादाश्री : परंतु मी गुरू बनण्यासाठी रिकामा नाही. मी तर तुम्हाला जे ज्ञान देतो, त्या ज्ञानात राहून तुम्ही आपले मोक्षाला निघून जा ना, गुरू बनवण्यासाठी का वाट पाहता? तुम्ही मला गुरू मानायची गरज नाही. मी गुरूपद स्थापन करू देणार नाही. तुम्हाला मी शेवटपर्यंतचे सर्व काही सांगून देईन. मग काही हरकत आहे का?
मी कुणाचा गुरू बनत नाही. मला गुरू बनून काय करायचे आहे ? मी तर ज्ञानी पुरुष आहे. ज्ञानी पुरुष म्हणजे काय? ऑब्जरवेटरी म्हणतात. येथे जे जाणायचे असेल, ते जाणले जाऊ शकते! समजले ना?
प्रश्नकर्ता : ज्ञानी, गुरू नाही का होऊ शकत?
दादाश्री : ज्ञानी कोणाचे गुरू बनत नाही ना! आम्ही तर लघुत्तम आहोत! मी गुरू कसे बनू शकतो? कारण माझ्यात बुद्धी मुळीच नाही आणि गुरू बनण्यासाठी तर बुद्धी हवी. गुरूमध्ये बुद्धी हवी की नको? आम्ही तर आमच्या पुस्तकात लिहिले आहे की आम्ही अबुध आहोत. या जगात कोणी स्वतः अबुध आहे असे लिहिले नाही. असे आम्ही एकटेच आहोत, की ज्याने सर्वप्रथम लिहिले की आम्ही अबुध आहोत. खरोखरच अबुध होऊन बसलो आहोत! आमच्यात थोडी सुद्धा बुद्धी मिळणार नाही. बुद्धीशिवाय चालत आहे ना आमची गाडी!!
__ अशा त-हेने हे सगळे गुरू यात काही न्याय वाटतो का तुम्हाला? 'मी सगळ्यांचा शिष्य आहे' असे मी सांगतो, त्यात काही न्याय वाटतो का?
प्रश्नकर्ता : हे सगळे कशा तहेने तुमचे गुरू आहेत?
दादाश्री : हे सगळेच माझे गुरू! कारण त्यांना जे काही प्राप्त झाले असेल ते मी लगेच स्वीकारतो. परंतु ते असेच समजतात की आम्ही दादांपासून घेत आहोत. या पन्नास हजार लोकांनाच नाही, परंतु सगळ्या