________________
१४७
प्रश्नकर्ता : जी शिखरे तुमच्यापेक्षा लहान असतील ती सर्व दिसतात ना ?
गुरु-शिष्य
दादाश्री : लहान दिसतात पण ती लहान गणली जात नाहीत. वस्तू तर एकच आहे ना! कारण मी ज्या शिखरावर आहे ना, तिथे मी लघुत्तम बनून बसलो आहे, व्यवहारात ! ज्यास व्यवहार म्हणतात ना, जिथे लोक गुरूत्तम होण्यासाठी गेले, तिथे मी लघुत्तम झालो आहे. आणि जे लोक गुरूत्तम होण्यासाठी गेले, त्यांना काय मिळाले? लघु झाले. व्यवहारात मी लघुत्तम झालो, म्हणून निश्चयात गुरूत्तम झालो !
या वर्ल्डमध्ये माझ्यापेक्षा कोणीच लघु नाही, असा मी लघुत्तम पुरुष आहे. जर छोटा बनला तर तो पुष्कळ मोठा भगवान होईल. तरी सुद्धा भगवान होण्यात मला ओझे वाटते, उलट लाज वाटते. आम्हाला ते पद नको आहे. आणि या अशा काळात ते पद का म्हणून प्राप्त करावे ? आम्हाला ते पद नकोच. या काळात तर जो तो व्यक्ती भगवान पद घेऊन बसला आहे. म्हणून तर दुरुपयोग होतो. आम्ही त्या पदाचे काय करणार ? मी ज्ञानी आहे, हे पद काय कमी आहे ? आणि संपूर्ण जगताच्या शिष्याच्या रूपात ज्ञानी आहे ! लघुत्तम पुरुष आहे !! मग यापेक्षा मोठे पद कोणते असेल ? लघुत्तम पदावरून कधीच खाली पडू शकत नाही, इतके मोठे पद आहे !!
आणि जो जगाचा शिष्य बनेल ना, तो गुरूत्तम बनेल ! मार्गच हा आहे, हो !! हे वाक्य दिशा बदलण्यास सांगत आहे. तुम्ही जो गुरूत्तम अहंकार करत फिरता, याचा अर्थ काय की 'मी अशा तऱ्हेने पुढे जाईन आणि भविष्यात मी मोठा कसा होईन!' असा जो तुम्ही प्रयत्न करत आहात, त्यास गुरूत्तम अहंकार म्हटला जातो. त्यापेक्षा 'मी कशा तऱ्हेने छोटा बनेल' अशा लघुत्तम अहंकारात जाल तर जबरदस्त ज्ञान प्रकटेल !! गुरूत्तम अहंकार नेहमी ज्ञानावर आवरण घालतो आणि लघुत्तम अहंकार ज्ञान प्रकट करते.
म्हणजे कुणी म्हटले की, 'साहेब, तुम्ही तर खूप मोठे मनुष्य आहात!' मी म्हणाले, 'भाऊ, तू मला ओळखत नाहीस, माझे मोठेपण नाही ओळखत. तू शिवी दिलीस तर कळेल की माझे मोठेपण आहे की