________________
१४८
गुरु-शिष्य
नाही ते. शिव्या दिल्या, तर पोलिसासारखा स्वभाव दिसून येतो की नाही ? त्यावेळी 'तू काय समजतोस ?' असे म्हणाला तर समजावे की आला पोलीस! पोलिसाचा स्वभाव माझ्यात दिसला तर समजावे की माझ्यात मोठेपण आहे. पोलिसाचा स्वभाव दिसला नाही तर 'मी लघुत्तम आहे' याची खात्री झाली ना !
आम्हाला कोणी शिवी दिली तर आम्ही त्याला म्हणतो की, 'हो बघ भाऊ, तुझी शिवी आम्हाला स्पर्श करु शकत नाही, त्याहूनही आम्ही छोटे आहोत. तेव्हा तू असे काही शोधून काढ, की जे आम्हाला स्पर्श करेल, अशी शिवी दे. तू आम्हाला, 'गाढव आहात' म्हणशील, तर गाढवाहूनही आम्ही खूप लहान आहोत. मग तुझे तोंड दुखेल. आम्हाला शिवी स्पर्श करेल असे आमचे स्थान शोधून काढ. आमचे स्थान लघुत्तम आहे !
जगाच्या शिष्यासच जग स्वीकारेल
म्हणजे 'हे' कोण आहेत ? तर लघुत्तम पुरुष ! लघुत्तम पुरुषांचे दर्शन होतीलच कसे? असे दर्शनच होत नाही ना ! जगात एक तरी मनुष्य असा शोधून काढा की जो लघुत्तम असेल. आणि हे जे पन्नास हजार लोक आहेत, पण या सगळ्यांचे आम्ही शिष्य आहोत. तुमच्या लक्षात आले ना ? मी स्वतः शिष्य बनवतच नाही. यांना मी शिष्य बनवले नाही.
प्रश्नकर्ता : तर मग आपल्यानंतर काय ? नंतर कोणी शिष्य नसेल तर काय होईल?
दादाश्री : काही गरजच नाही ना! आमचा एक सुद्धा शिष्य नाही. परंतु रडणारे पुष्कळ आहेत. कमीत कमी चाळीस-पन्नास हजार माणसे रडणारी आहेत.
प्रश्नकर्ता : परंतु आपल्यानंतर कोण ?
दादाश्री : नंतर कोण आहे ते तर आलेली वेळच सांगेल. मी काहीच जाणत नाही आणि असा विचार करण्यासाठी मला फुरसत सुद्धा नाही.
प्रश्नकर्ता : आपण म्हणता की माझ्या पाठीमागे चाळीस-पन्नास