________________
१४४
गुरु-शिष्य
आज एकही गुरू असे नाहीत की ज्यांनी लघुत्तम बनण्याचा प्रयत्न केला असेल! सगळेच गुरूतेकडे वळले आहेत. 'कशा तहेने मी उच्चस्थानी जाऊ!' त्यात कुणाचा दोष नाही. हा काळच बाधक आहे. बुद्धी वाकडी चालते. या सगळ्या गुरूंचे काम काय असते? तर कशा त-हेने मोठा होऊ? गुरूत्व वाढविणे, हाच त्यांचा व्यापार असतो. लघुत्वाकडे जातच नाहीत. व्यवहारात गुरूत्व वाढत गेले, नाव झाले की 'भाऊ, यांचे तर एकशे आठ शिष्य आहेत.' म्हणजे निश्चयात तितके लघु झाले, लघुत्तम होत चालले आहे. व्यवहारात गुरू होऊ लागले ही मागे पडण्याची निशाणी आहे.
घरी एक बायको होती आणि दोन मुले होती, त्या तीन घंटांना सोडून येथे साधू बनले! या तीन घंटांचा कंटाळा आला आणि तिथे एकशे आठ घंटांना (शिष्यांना) कवटाळले. अरे, त्या तिघांना सोडून एकशे आठ घंटाना का कवटाळले? त्यापेक्षा तर ती बायको आणि मुले काय वाईट होती? म्हणजे होती ती घंटा सोडली आणि ही नवीन घंटा कवटावळली. ती पितळ्याची घंटा होती आणि ही सोन्याची घंटा! मग ह्या घंटा वाजत राहतात. कशासाठी हे सगळे वादळ उभे केले!
आपण शिष्य बनवलेत की नाही? प्रश्नकर्ता : दादांनी कोणाला शिष्य बनवले आहे का?
दादाश्री : मी साऱ्या जगाचा शिष्य बनून बसलो आहे. मी शिष्यांचाही शिष्य आहे. मला शिष्य कशाला हवेत? या सगळ्यांना कशाला चिकटवून घेऊ? तशी तर पन्नास हजार माणसे माझ्यामागे फिरतात. पण मी या सगळ्यांचा शिष्य आहे.
___ 'आपण' गुरू आहात की नाही? प्रश्नकर्ता : तर आपण गुरू नाहीत?
दादाश्री : नाही, मी तर सगळ्या जगाचा शिष्य आहे. मी कशासाठी गुरू बनू?