________________
गुरु-शिष्य
१४३
जात आहेत, रताळे भट्टीत भाजतात, तसे भाजले जात आहेत! किंवा मासे जसे पाण्याच्या बाहेर तडफडतात तसे तडफडत आहेत. म्हणून आम्हाला सगळीकडे फिरत राहावे लागते. बऱ्याच लोकांनी शांतीचा मार्ग प्राप्त केला.
प्रश्नकर्ता : म्हणजे की ही गरज नाही, परंतु या सगळ्या जीवांचे कल्याण व्हावे, अशी भावना होते ना!
दादाश्री : कल्याण झाले तर चांगले अशी भावना असते. या वर्ल्डमध्ये तीर्थंकर आणि ज्ञानींशिवाय कोणीही जगतकल्याणाची भावना केली नाही. स्वत:च्याच पोटापाणयाची सोय नसेल तिथे मग लोकांचा विचार कसा काय करणार? सगळ्या लोकांनी कुठली भावना केली? तर ते उच्च पद शोधत राहिले. साधु असेल तर 'मला आचार्य कधी बनवाल?' आणि आचार्य असेल तर 'मला अमका कधी बनवतील?' हीच भावना सगळ्यांची असते. आणि येथे लोकांना काळाबाजार करण्याची भावना असते! कलेक्टर असेल तर 'मला कमिशनर कधी बनवणार' हीच भावना असते !! जगत कल्याणाची तर कोणाला पडलेली नाही. म्हणजे रिलेटिव्हमध्ये जगत गुरूतेकडे जात आहे. गुरूत्तम तर होऊ शकत नाही.
प्रश्नकर्ता : रिलेटिव्हमध्ये गुरूता म्हणजे काय?
दादाश्री : गुरूता म्हणजे मोठे होण्याचीच इच्छा करतात. उंच चढू इच्छितात. ते असे समजतात की गुरूत्तम झालो तर मोठे झालो, त्यांना रिलेटिव्हमध्येच गुरूता हवी आहे. मग कधी मार्गी लागेल? कारण रिलेटिव्ह हे विनाशी आहे. त्याने गुरूता गोळा केलेली असते म्हणून तो मोठे बनण्याच्याच मागे असतो. परंतु कधी खाली पडेल ते सांगता येत नाही? रिलेटिव्हमध्ये तर लघुता हवी. रिलेटिव्हमध्ये हे सगळे गुरू बनण्यासाठी फिरतात, त्यातून काही निष्पन्न होणार नाही.
गुरूताच पछाडते शेवटी बाकी, जो लघुत्तम झाला नाही, तो गुरूत्तम होण्यास पात्र नाही.