________________
गुरु-शिष्य
काही दुःख असेल, तर मला सांगा की, 'दादा मला इतकी दुःखं आहेत, ती मी तुम्हाला सोपावतो.' आणि ती घेतली तर निकाल लागेल, नाही तर निकाल कसा लागेल ?
१४१
मी या दुनियेचे दुःखं घेण्यासाठी आलो आहे. तुमचे सुख तुमच्याकडे राहू द्या. त्यात तुम्हाला काही हरकत आहे का ? तुमच्यासारखे येथे पैसे देतील, पण मी त्या पैशांचे काय करु? मी तर दुःख घेण्यासाठी आलो आहे. तुमचे पैसे तुमच्याकडे राहू द्या, ते तुमच्या कामास येतील आणि जिथे ज्ञानी असतील, तिथे पैशांचे देणेघेणे नसते. ज्ञानी तर उलट तुमची सगळी दुःखं निवारण्यासाठी आलेले असतात, दुःखं उभी करण्यासाठी आलेले नसतात.
प्योरिटी 'ज्ञानीं 'ची
मी जर लोकांकडून पैसे घेतले, तर लोक मला हवे तितके पैसे देतील. पण मी पैशांचे काय करु? कारण ती सगळी भीक (लालसा) गेल्यानंतरच तर मला हे ज्ञानीचे पद मिळाले ! !
अमेरिकेत गुरूपौर्णिमेच्या दिवशी लोक मला सोन्याची साखळी घालत असत. दोन-दोन, तीन-तीन तोळ्यांची! पण मी ते सगळ्यांना परत करत असे. कारण मला काय करायचे आहे ? तेव्हा एक ताई रडू लागली की 'माझी माळ तर घ्यावीच लागेल' मग मी तिला म्हटले, 'मी तुला एक माळ दिली तर ती तू घालशील ?' तर त्या ताईने म्हटले 'माझी काही हरकत नाही, पण तुमच्याकडून घेणे मला योग्य वाटत नाही. ' नंतर मी सांगितले, 'मी तुला इतरांमार्फत देईन.' एक मण वजनाची सोन्याची साखळी बनवूया आणि मग ती रात्री (गळ्यात) घालून झोपावे लागेल, अशी अट घातली तर ती साखळी घालून झोपशील का ? दुसऱ्याच दिवशी म्हणशील, ‘घ्या दादा, हे तुमचे सोने. ' सोन्यात सुख जर असते, तर जास्त सोने मिळाल्यावर आनंद वाटते. पण यात सुख आहे ही तुझी मान्यता आहे, राँग बिलीफ आहे. त्यात काय सुख असेल? सुख तर, जिथे कुठलीही वस्तू घ्यायची नसेल, तिथे सुख असते. या जगात कुठलीही वस्तू ग्रहण करायची नसेल, तिथे सुख असते.