________________
१४०
गुरु-शिष्य
इतक्या मोठ्या तीन पेट्या कामगाराबरोबर वरती पाठवल्या. मग शेठ वरती मला भेटण्यासाठी आला. मी विचारले 'हे सर्व काय आहे शेठ ?' मग शेठ सांगतात, 'काही नाही, फूल ना फुलाची पाकळी...' मी म्हटले, 'कशासाठी या पाकळ्या आणल्यात?' तेव्हा ते म्हणाले 'काही नाही, काही नाही साहेब.' मी म्हटले 'तुम्हाला काही दुःख किंवा अडचण आहे का?' त्यावर ते बोलले 'शेर माती, (एखादे मुल हवे आहे)' 'अरे, शेर माती कुठल्या जन्मात नव्हती? कुत्र्याच्या जन्मात गेलो तिथे पिल्ले होती, गाढवाच्या जन्मात गेलो तिथे सुद्धा पिल्ले होती, माकडाच्या जन्मात गेलो तिथे सुद्धा पिल्ले होती. जिथे गेलो तिथे पिल्ले! अरे, कोणत्या जन्मात नव्हती ही माती? अजूनही शेर माती हवी आहे ? हे तर देव तुमच्यावर प्रसन्न झाले आणि तरी तुम्ही मातीच शोधत आहात? आणि वर मला लाच देण्यासाठी आला आहात? तुमची घाण मला चोपडण्यासाठी आलात? मी व्यापारी माणूस! मग माझ्याजवळ घाण आली तर मी कोणाला चोपडण्यास जाऊ? बाहेरच्या सगळ्या गुरूंना चोपडून या. त्या बिचाऱ्यांजवळ घाण येत नाही. ही झंझट येथे कशाला आणली? मग ते म्हणाले, 'साहेब, कृपा करा' मग मी म्हटले, 'हो, कृपा करीन, शिफारस करीन.'
तुम्हाला जे दु:ख आहे, त्यासाठी आम्ही तर 'ह्या बाजूचा' 'फोन' उचलतो आणि 'त्या बाजूला (देवी-देवतांना) फोन करतो! यात आमचे काही सुद्धा नसते. मात्र एक्सचेंज करायचे. नाही तर आम्हा ज्ञानी पुरुषास हे असे सर्व नसतेच ना! ज्ञानी पुरुष यात हातच घालत नाहीत. परंतु या सगळ्यांची दु:खं ऐकावी लागली ना! ही सगळी दुःखं दूर करावी लागली ना? अडचण असेल तर पैसे मागण्यासाठी या. आता, मी तर पैसे देत नाही. मी परस्पर फोन करीन. पण मग लोभ करू नका. तुला अडचण असेल तरच ये. तुझी अडचण दूर करण्यासाठी सर्व काही करीन. पण लोभ करशील त्याक्षणी मी बंद करीन.
तुमची दुःखं माझ्यावर सोपवा आणि जर तुमचा विश्वास असेल तर ती दु:खं पण तुमच्याजवळ येणार नाहीत. माझ्यावर सोपवून दिल्यावर तुमचा विश्वास उडाला तर तुमच्याजवळ परत येतील. म्हणून तुम्हाला