________________
१३८
गुरु-शिष्य
प्रश्नकर्ता : एक सुद्धा नाही.
दादाश्री : ती माया सुटत नाही ना! गुरूत सुद्धा माया शिरलेली असते. कलियुग आहे ना! म्हणून थोडीफार तरी शिरतेच ना? तेव्हा जिथे स्त्री संबंधी विचार आहे, जिथे पैशांचे देणेघेणे आहे, तिथे खरा धर्म असू शकत नाही. हे संसारी माणसांसाठी नाही, परंतु जे उपदेशक असतात ना, ज्यांच्या उपदेशानुसार आपण चालतो, तिथे असे नसावे. नाही तर या संसारी माणसांकडेही तेच आहे आणि तुमच्याकडेही तेच? असे असता कामा नये. आणि तिसरे काय? तर सम्यक् दृष्टी असली पाहिजे.
तेव्हा जिथेही लक्ष्मी आणि स्त्री संबंध असतील, तिथे थांबूच नये. गुरू नीट पाहून करा. लिकेजवाला (दोषयुक्त)असेल तर बनवू नका. थोडे सुद्धा लिकेज चालणार नाही. गाडीतून फिरत असतील तरी हरकत नाही, परंतु चारित्र्यात फेल (नापास) असेल तर मात्र हरकत आहे. बाकी, हा अहंकार असेल त्याची हरकत नाही, की 'बापजी, बापजी' केले तर खुश होतात, त्यास हरकत नाही. चारित्र्यात फेल नसेल तर चालवून घेतले पाहिजे. सर्वात मुख्य वस्तू म्हणजे चारित्र्य!
प्रश्नकर्ता : लक्ष्मी आणि स्त्री ह्या खऱ्या धार्मिकतेच्या विरुध्द आहेत! परंतु स्त्रिया तर अधिक धार्मिक असतात, असे म्हटले जाते.
दादाश्री : स्त्रीमध्ये धार्मिकता असते यात शंका नाही, धर्मात स्त्रिया असतील तर हरकत नाही, परंतु कुदृष्टी असेल तर हरकत आहे, कुविचार असेल तर हरकत आहे. स्त्रीला भोगाचे स्थान मानता त्यात हरकत आहे. तो आत्मा आहे, भोगाचे स्थान नव्हे.
बाकी जिथे लक्ष्मी घेतली जाते, फीच्या स्वरूपात लक्ष्मी घेतली जाते, टॅक्सच्या स्वरूपात लक्ष्मी घेतली जाते, भेटच्या रूपात घेतली जाते, तिथे धर्म नसतो. पैसे असतील तिथे धर्म नसतो व धर्म असेल तिथे पैसा नसतो. म्हणजे ही समजेल अशी गोष्ट आहे ना? जिथे विषयविकार आणि पैसे असतील, तिथे ते गुरू देखील नाहीत. आता गुरू सुद्धा चांगले तयार होतील. आता सगळे काही बदलेल. चांगले म्हणजे शुद्ध. हो,