________________
गुरु-शिष्य
१३९
गुरूला पैशांची अडचण असेल, तर आम्ही विचारावे की तुम्हाला स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काही हवे आहे का? बाकी, त्यांना दुसरे काही नसावे. किंवा 'मोठे बनायचे असेल, विशेष व्हायचे असेल,' असे सर्व नसावे.
त्याचे नावच वेगळेपण हे काय सुखी लोक आहेत? मुलतः दुःखी आहेत लोक. आणि त्यांच्याकडून पैसे घेता? स्वत:चे दुःख घालविण्यासाठी तर ते गुरूजवळ जातात ना? मग तुम्ही त्यांचे पंचवीस रुपये घेऊन त्यांचे दुःख का वाढवता? कोणाकडूनही एक पैसा सुद्धा घ्यायला नको. दुसऱ्यापासून काहीही घेणे, त्यास वेगळेपण म्हटले जाते. आणि याचेच नाव संसार! त्यात तोच भटकला आहे, जो घेणारा मनुष्य आहे तोच भटकलेला म्हटला जातो. समोरच्याला परका समजतो म्हणून तो पैसे घेतो. __या दुनियेतील कोणतीही वस्तू, एक रुपया जरी मी खर्च केला तर मी तितका दिवाळखोर होऊन जाईन. भक्तांची एक पै देखील वापरु शकत नाही. हा व्यापार ज्याने चालू केला आहे तो स्वतः दिवाळखोरीच्या स्थितीत जाईल, म्हणजे त्याला जी काही सिद्धी प्राप्त झाली असेल, ती गमावून बसेल. जी थोडीफार सिद्धी प्राप्त झाली होती म्हणून तर लोक त्यांच्याकडे येत होते. पण मग सिद्धी नष्ट होईल! कुठल्याही सिद्धीचा दुरुपयोग केला तर ती सिद्धी संपून जाते.
सर्व दुःखांपासून मुक्ती मागणे, किंवा... कित्येक लोक येथे येऊन पैसे ठेवतात. अरे, येथे पैसे वगैरे काही ठेवायचे नसते. येथे मागायचे असते. येथे ठेवायचे असते का? जिथे ब्रम्हांडाचा मालक बसला आहे तिथे ठेवायचे असते का? तिथे तर आपण मागायचे असते की 'मला अशी अडचण आहे, ती दूर करा.' बाकी, पैसे तर एखाद्या गुरूच्या पुढे ठेव. त्यांना काही कपडे वगैरे पाहिजे असतील, दुसरे काही पाहिजे असेल. ज्ञानी पुरुषास तर काहीच नको असते.
सांताक्रुजमध्ये आम्ही जिथे राहत होतो तिथे एका मिलच्या शेठनी