________________
१४२
गुरु-शिष्य
मी तर माझ्याच घरचे, माझ्या स्वत:च्या व्यापाराच्या कमाईचे, माझ्या प्रारब्धाचे खातो आणि कपडे घालतो. मी कोणाचे पैसे घेतही नाही आणि कोणी दिलेले काही घालतही नाही. हे धोतर सुद्धा मी माझ्या कमाईचे नेसतो. इथून मुंबईला जाण्याचे विमानाचे तिकीट सुद्धा माझ्याच स्वत:च्या पैशांचेच! मग पैशांची गरजच कुठे आहे? मी जर एक पैसा देखील लोकांकडून घेतला तर लोक माझे शब्द कसे स्वीकारतील! कारण त्यांच्या घरचे उष्टे मी खाल्ले. आम्हाला काहीच नको. ज्याला कुठल्याही प्रकारची भीकच नाही, त्याला देव सुद्धा काय देतील?
एक मनुष्य मला धोतर देण्यास आला, दुसरा फलाणे देण्यास आला, माझी इच्छा असती तर गोष्ट वेगळी होती, परंतु माझ्या मनात कुठल्याही प्रकारची इच्छाच नाही!! मला फाटलेले असेल तरी चालते. म्हणून माझे म्हणणे आहे की जितके शुद्ध ठेवाल तेवढे या जगाला लाभदायक होईल!
स्वतःची स्वच्छता म्हणजे... या दुनियेत जितकी तुमची स्वच्छता, तितकी दुनिया तुमची! तुम्ही मालक आहात या दुनियेचे! मी या देहाचा मालक सव्वीस वर्षांपासून झालो नाही म्हणून आमची स्वच्छता संपूर्ण असते! म्हणून स्वच्छ व्हा, स्वच्छ!
प्रश्नकर्ता : स्वच्छतेचा खुलासा करा.
दादाश्री : स्वच्छता म्हणजे या दुनियेतील कोणत्याही वस्तूची ज्याला गरज नसेल, भिकारीपणाच नसेल!!
गुरूताच आवडते जीवाला म्हणजे येथे वेगळ्या प्रकारचे आहे, हे दुकान नव्हे. तरी पण लोक तर यास दुकानच म्हणतील. कारण बाकी सगळ्यांनी दुकाने काढली तशी तुम्ही सुद्धा कशासाठी दुकान काढले? तुम्हाला काय गरज होती? तर मला सुद्धा तशी गरज तर आहेच ना, की मी जे सुख मिळवले ते तुम्ही सुद्धा मिळवावा! कारण लोक कसे भट्टीत भाजले