________________
गुरु-शिष्य
आम्हालाही फसवण्यासाठी येतात, अशी लाडीगोडी करणारे येतात, परंतु मी काही फसला जात नाही! आमच्याकडे लाखो लोक येतात. गोड-गोड बोलतात, सगळं काही करतात, पण राम तुझी माया...! त्यांना काही गळच मिळत नाही ना! त्यांना माहीत आहे की दादांजवळ असे काहीच चालणार नाही, म्हणून परत जातात. असे 'गुरू' पाहिले आहेत, फसवणारे 'गुरू' पाहिले आहेत. तसे गुरू आले तर मी लगेच ओळखतो की ते आले आहेत. फसवणाऱ्याला 'गुरू' च म्हणायचे असते ना! नाही तर दुसरे काय म्हणणार? आणि ‘फसविणारा' हा शब्द तर बोलूच शकत नाही. तेव्हा 'गुरू'च म्हणायचे ना!
प्रश्नकर्ता : हो.
दादाश्री : असे बरेच भेटले. मी त्यांच्या तोंडावर काहीच बोलत नाही. ते स्वतःच वैतागून परत जातात की, 'मी येथे सांगण्यासाठी आलो आहे, पण हे तर काही ऐकतच नाहीत. हे एवढे सारे त्यांना देण्यासाठी आलो आहे.' मग तो कंटाळतो की 'या दादांजवळ आपली डाळ शिजणार नाही, ही खिडकी भविष्यात उघडणार नाही.' अरे, मला काहीच नको, कशासाठी खिडकी उघडण्यास आला आहेस? ज्याला हवे असेल तिथे जा ना, लालची असेल तिथे जा. येथे तर कसलीच लालूच नाही ना! कसेही आले तरी सुद्धा त्यांना परत पाठवतो की 'भाऊ, येथे नाही!'
लोक तर सांगतील की, 'या, या, काका, तुमच्याशिवाय तर मला करमतच नाही. काका, तुम्ही सांगाल तितके तुमचे काम करेन, तुम्ही सांगाल ते सगळेच. तुमचे पाय चेपीन.' अरे, हा तर लाडीगोडी लावतो, तिथे मग बघिर व्हावे.
अर्थात सगळे काही सरळ झाले आहे, तर आता आपले काम पूर्ण करुन घ्या. एवढेच मी सांगू इच्छितो. याहून जास्त सरळ होणार नाही, इतके सरळ होणार नाही, असा चान्स (संधि) पुन्हा येणार नाही. हा चान्स फार उच्च प्रकारचा आहे ना, म्हणून या सर्व लाडीगोडीच्या गोष्टी कमी होऊ द्या ना! अशा गोष्टीत मजा नाही. लाडीगोडी करणारे लोक तर