________________
गुरु-शिष्य
१३५
प्रश्नकर्ता : लोकांची श्रद्धा आहे म्हणून.
दादाश्री : नाही. लालची आहेत म्हणून. श्रद्धा नाही, त्यास श्रद्धा म्हणत नाही. लालची मनुष्य कुठलाही नवस करेल. वेड्या माणसाचा सुद्धा नवस करतील. कोणी सांगितले की 'हा वेडा आहे, जो लोकांना मुलगा देतो.' तर हे लोक 'बापजी, बापजी' करून त्याच्या सुद्धा पाया पडतील. आणि त्यानंतर मुलगा झाला तर म्हणतील, याच्यामुळेच झाला ना? लालची माणसांना काय सांगावे?
लोक तर मला सुद्धा म्हणतात की 'दादांनीच हे सगळे दिले आहे.' तेव्हा मी सांगतो की, 'दादा काही देतात का?' परंतु सगळे दादांवर आरोप करतात! तुमचे पुण्य आणि माझे यशनाम कर्म असते, म्हणून आम्ही हात लावला आणि तुमचे काम झाले. तेव्हा हे सगळे म्हणतात, 'दादाजी हे सगळे तुम्हीच करत आहात.' मी म्हणतो की 'नाही,' मी करत नाही. तुमचेच (फळ) तुम्हाला मिळते. मी कशासाठी करु? मी कशासाठी या फंदात पडू? या झंझटीत मी कशाला पडू ? कारण मला काहीही नको. ज्याला काहीच नको असेल, ज्याला कुठलीही वासना नाही, कुठल्याही गोष्टीचे भिकारी नाहीत, तेव्हा तिथे तुमचे (मोक्षाचे)काम साधून घ्या.
मी तर काय म्हणतो की आमचे चरण उमटवा, पण ते लक्ष्मीच्या वासनेने करू नका. ठीक आहे, तसे काही निमित्त असेल तर आमचे चरण उमटवा.
प्रश्नकर्ता : घराच्या उद्धाराऐवजी, स्वतःचा उद्धार होईल, तसे तर करू शकतो की नाही?
दादाश्री : हो. सर्व काही करू शकतो. सर्व काही होऊ शकते. परंतु लक्ष्मीची वासना नसावी. दानत खराब नसावी. आणि हे तुम्ही मला बळजबरी उचलून नेले, त्यास काही पावले उमटवलीत असे म्हणता येईल? पावले उमटवणे म्हणजे तर ते माझ्या राजी-खुशीने व्हायला हवे. मग भले, तुम्ही मला शब्दानी खुश करा किंवा कपटाने खुश करा. पण मी कपटाने खुश होईन असा नाही.