________________
१२८
गुरु-शिष्य
मी तर आधीपासूनच आश्रमाच्या विरुध्द आहे ! मी तर आधीपासूनच काय म्हणतो? 'की, भाऊ, मला आश्रमाची काही गरज नाही. जे लोक येथे आश्रम बनवण्यासाठी आले होते ना, त्यांना मनाई केली. मला आश्रमाची काय गरज? आपल्याकडे आश्रम नसतातच.
म्हणून मी आधीपासूनच सांगितले आहे की ज्ञानी पुरुष कोणाला म्हणतात की जे आश्रमाचा श्रम करीत नाहीत. मी तर झाडाखाली बसून सत्संग करीन असा माणूस आहे. येथे जर जागेची सोय नसेल तर एखाद्या झाडाखाली बसून सुद्धा आरामात सत्संग करीन. आम्हाला काही हरकत नाही. आम्ही तर उदयाधीन आहोत. महावीर भगवंत सुद्धा झाडाखाली बसून सत्संग करीत असत. ते काही आश्रम शोधत नव्हते. आम्हाला खोली सुद्धा नको, काहीच नको. आम्हाला कशाचीच गरज नाही ना! कोणत्याही गोष्टीची गरज नाही. ज्ञानी पुरुष आश्रमाचा श्रम करीत नाहीत.
प्रश्नकर्ता : त्यांच्यासाठी अप्रतिबद्ध विहारी शब्द वापरला आहे ?
दादाश्री : हो. आम्ही निरंतर अप्रतिबद्ध रूपाने विचरण करतो (वावरतो), द्रव्य-क्षेत्र-काळ आणि भावाने निरंतर अप्रतिबद्ध रूपाने विचरण करतो, असे ज्ञानी पुरुष!!
पूर्ण जग आश्रम बनवते. मुक्ती मिळवायची असेल तर आश्रमाचे ओझे परवडत नाही. आश्रमाऐवजी तर भीक मागून खाणे चांगले. भीक मागून खाण्यासाठी भगवंताने सूट दिली आहे. भगवंताने काय सांगितले की भीक मागून तू लोकांचे कल्याण कर. तुझ्या पोटापुरतीच भानगड आहे ना! आश्रम तर सत्युगात होते, तेव्हा स्वतः मोक्षासाठीच प्रयत्न करीत असत, आणि या कलियुगात तर श्रम घालवण्याचे संग्रहस्थान आहे. आता कुणाला मोक्षाची पडलेली नाही. म्हणून या काळात आश्रम बनवण्यासारखे नाही.
ते भगवंतापर्यंत पोहोचत नाही हे तर केवळ बिझनेसमध्ये पडलेले लोक आहेत. ते लोक धर्माच्या