________________
गुरु-शिष्य
१२७
प्रश्नकर्ता : आश्रम पद्धतीमुळे भेद-अभेद आणि संप्रदाय उत्पन्न होतात की नाही?
दादाश्री : आश्रम पद्धती हे संप्रदाय उभे करण्याचे साधनच आहे. संप्रदाय बनवणारे सगळे अहंकारी आहेत, ओव्हरवाईज-अतिशहाणे! नवीनच काही तरी उभे करतात, तृतीयम!! मोक्षाला जाण्याची भावनाच नाही. स्वतःचे शहाणपण दाखवायचे असते ते नवे-नवे भेद निर्माण करतात आणि जेव्हा ज्ञानी प्रकट होतात तेव्हा ते सगळे भेद मिटवून टाकतात, कमी करतात. लाख ज्ञानींचा एकच अभिप्राय असतो, आणि एका अज्ञानीचे लाख अभिप्राय असतात.
प्रश्नकर्ता : म्हणायला तो आश्रम असतो, परंतु तिथे परिश्रम असतो.
दादाश्री : नाही, नाही. हिंदुस्तानातील लोकांनी आश्रमाचा काय उपयोग केला आहे, ते तुम्हास सांगू? घरचा कंटाळा आला असेल ना, तर तो पंधरा दिवस तिथे जाऊन आरामात खातो-पितो आणि राहतो. हाच धंदा केला आहे. म्हणून ज्याला श्रम घालवायचा असेल आणि खाऊन-पिऊन झोपायचे असेल, त्यांनी आश्रम ठेवावा. बायको त्रास देत नाही, कोणीच त्रास देत नाही. घरी बायको-मुलांची भांडणे होतात. तिथे आश्रमात कोणी भांडणाराच नाही ना, कोणी टोकणारच नाही ना! तिथे तर एकांत मिळतो, म्हणून निवांतपणे घोरत राहतो. ढेकूण नाहीत, काहीच नाही. थंड वारा! संसाराचा जो थकवा आला होता, तो तिथे जाऊन घालवतात.
__ आता जर असे खाऊन-पिऊन पडून राहत असतील तरी ठीक होते, परंतु हे तर दुरुपयोग करतात, आणि त्यामुळे स्वत:ची अधोगती ओढवून घेतात. त्यात ते दुसऱ्यांचे नुकसान करत नाहीत, पण स्वतःचेच नुकसान करतात. कदाचित त्यातले एक-दोन चांगले सुद्धा असतील! बाकी, आश्रम म्हणजे पोल चालवण्याचे साधन !!
प्रश्नकर्ता : तुम्ही जो मार्ग दाखवता त्यात आश्रम-मंदिर या सगळ्यांची आवश्यकता आहे का?
दादाश्री : येथे आश्रम-बिश्रम नसतो. येथे कसला तो आश्रम?