________________
गुरु-शिष्य
१२५
आहे. जिथे भीक असेल तिथे भगवंत कसे भेटतील? हा भीक शब्द असा आहे की बिन फासाने फासावर जाईल!
संपूर्ण भीक गेल्यानंतरच हे जग ‘जसे आहे तसे' दिसते. जोपर्यंत माझ्यात भीक असेल, तोपर्यंत मला दुसरे कोणी भिकारी वाटणार नाही. परंतु स्वत:ची भीक गेली, की मग सगळे भिकारीच वाटतील.
ज्यांची सर्व प्रकारची भीक मिटते, त्यांना ज्ञानीचे पद मिळते. ज्ञानीचे पद केव्हा मिळते? सर्व प्रकारची भीक संपून जाईल, लक्ष्मीची भीक, विषयांची भीक, कोणत्याच प्रकारची भीक नसते तेव्हा हे पद प्राप्त होते.
भीक नसेल तर देवच आहे, ज्ञानी आहे, जो म्हणाल तो आहे. भीकेमुळेच हा असा झाला आहे. विनवणी म्हणूनच करावी लागते ना! भीक फक्त कुठे ठेवायची? ज्ञानी पुरुषांजवळ ! ज्ञानी पुरुषांजवळ जाऊन सांगा की, 'बापजी, प्रेमाचा प्रसाद द्या.' ते तर देतच असतात, परंतु आम्ही मागितला तर विशेष मिळतो. जसा गाळलेला चहा आणि बिनगाळलेल्या चहा, यात फरक असतो ना, तेवढा फरक पडतो. गाळलेल्या चहामध्ये चहाची पाने येत नाहीत.
प्योरिटीशिवाय प्राप्ती नाही म्हणजे ही भीक आहे म्हणून तर भानगड आहे, प्योरिटी (शुद्धता) राहिली नाही. जिकडे-तिकडे व्यापार झाला आहे. जिथे पैशांचे देणेघेणे झाले आणि जिथे दुसरे सर्व घुसले, तो सगळा व्यापार झाला. त्यात मग सांसारिक लाभ घेण्याची तयारी असते. भौतिक लाभ, हा सगळा व्यापार म्हटला जातो. दुसरे काही घेत नसेल पण मानाची इच्छा असेल तरी सुद्धा तो लाभ म्हटला जातो. तोपर्यंत सगळा व्यापारच म्हटला जातो.
हिंदुस्तान असा देश आहे, की सगळ्यांचा व्यापार चालतो. परंतु व्यापारात जोखीम असते. आम्ही काय म्हटले पाहिजे की तुम्ही असे करत आहात, परंतु असे करण्यात जोखीम आहे.
प्रश्नकर्ता : धर्माच्या नावावर एवढे सारे ढोंग का चालतात?