________________
गुरु-शिष्य
१२३
झळकतोच ना, कोणासमोर ! तेव्हा लोक म्हणतील, 'बघा पितळ उघडे पडले!' त्याचा पोतापणां बाहेर येतो, त्यामुळे कधीच भले होत नाही! म्हणजे पुजले जाण्याची कामना सुटत नाही, अनादी काळापासून ही भीक सुटली नाही.
राहीले नाही नाव कोणाचेही मग नावाची सुद्धा भीक असते, म्हणून पुस्तकात सुद्धा त्यांचे नाव छापायला लावतात. अरे, त्यापेक्षा तर लग्न करायचे होते ना, मग मुलांनी तुझे नाव राखले असते. आता गुरू झाल्यानंतर कशासाठी नाव ठेवायचे? पुस्तकात सुद्धा नाव! 'माझे आजोबा गुरू आणि माझे वडील गुरू आणि अमके गुरू! असेच सर्व छापत राहतात. या मंदिरात सुद्धा नाव घालू लागले की 'या गुरूने हे बनवले,' अरे, नाव राहते का कधी? संसारी माणसांचे राहत नाही, तर साधूंचे नाव राहील? नाव ठेवण्याची इच्छाच असू नये. कुठलीही इच्छा ठेवणे ही भीक आहे.
ध्येय चुकले आणि भीक शिरली __ ही भीक जात नाही. मानाची भीक, किर्तीची भीक, विषयाची भीक, लक्ष्मीची भीक... भीक, भीक आणि भीक ! बिन भीकवाले पाहिले आहेत का? शेवटी मंदिर बनवण्याची सुद्धा भीक असते, म्हणून मंदिर बांधण्यासाठी खटपट करतात. कारण दुसरे काही काम सुचले नाही म्हणून मग किर्तीसाठी असे सर्व करतात. अरे, कशासाठी मंदिर उभारता? हिंदुस्तानात मंदिरे नाहीत का? परंतु हे तर मंदिर उभारण्यासाठी पैसा गोळा करत राहतात. देवांनी सांगितले होते की मंदिर उभारणारे हे तर, जेव्हा त्यांची कर्म उदयास येतील तेव्हा उभारतील. तू कशाला त्यात पडतोस?
हिंदुस्तानाचा मनुष्यधर्म फक्त मंदीरे उभारण्यासाठी नाही. केवळ मोक्षला जाण्यासाठीच हिंदुस्तानात जन्म होतो. एक अवतारी होता येईल असे ध्येय ठेऊन काम करा, तर पन्नास जन्मात सुद्धा, शंभर जन्मात, किंवा पाचशे जन्मात तरी सुटका होईल. दुसरे ध्येय सोडा. मग लग्न करा, मुलांचे बाप व्हा, डॉक्टर व्हा, बंगले उभारा, त्यात हरकत नाही. परंतु